एक इंग्रजी दैनिकाने लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी असणाऱ्या उत्पादनाच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत दांडिया या हिंदू सणाची विटंबना केली आहे. असा आरोप बेळगावच्या डॉ सोनाली सरनोबत यांनी केला आहे.
याबद्दल डॉ सोनाली यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून निषेध व्यक्त केला आहे. पुरुषांनी दांडिया खेळताना या प्रॉडक्ट चा उपयोग करून ऑन राहा असा संदेश या जाहिरातीत देणारी ती कंपनी आणि त्या माध्यमाची लाज वाटते. असे त्यांनी #shame घालून व्यक्त केले आहे.
या जाहिरातीने फक्त हिंदू धर्म भावनाच दुखावल्या नाहीत तर १९९५ व २०११ च्या ड्रग आणि मेडिकल रेमिडी कायद्याचाही भंग केला आहे, असे त्यांनी या ट्विट द्वारे म्हटले आहे.
@PMOIndia @smritiirani @TOIIndiaNews @ShobhaBJP @BSYBJP @Office_of_BSY @niku1630 @RSSorg @HegdeMK @BJP4India @BJP4Karnataka I condemn this advertisement of maligning Hindu Sentiments #Dandeeya means what ? Shame#TOI pic.twitter.com/gkR3ioBw8y
— Dr Sonali Sarnobat(BJPMedical Cell,KAWB Member) (@drsonalisameer) October 12, 2018
Checkout today’s TOI
#Shame
वरील लिंक वर जाऊन आपण ती ट्विट पाहू शकता.
पंतप्रधान तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींनी याची दखल घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे.