Monday, December 23, 2024

/

‘दहशत मोबाईल पळवणाऱ्या गँगची’

 belgaum

आजकाल मोबाईल घेऊन बोलत चालणे फारच असुरक्षित होत आहे. रस्त्यावरून जाताना मोबाईल पळवला जाण्याच्या घटनांत अधिक वाढ झाली आहे. बेळगाव मध्ये आणि जिल्ह्यात सक्रिय झालेल्या या गँगला पकडण्याचे खुले आव्हान बेळगाव पोलिसांसमोर उभे आहे.
काही महिन्यांपूर्वी गळ्यातील सोन्याच्या चेन आणि मंगळसूत्र पळवणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. आपली मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ नये या भीतीने लोकांनी त्या गळ्यात घालणे बंद केले. आता मोबाईल हिसकावणारी गँग सक्रिय झाल्याने मोबाईल वापरणे बंद करावे लागण्याची अवस्था आली आहे. मागील १५ ते २० दिवसात या गँगने असंख्य मोबाईल लांबवले असून फक्त माळमारुती पोलीस स्थानकात अश्या सात केस नोंद झाल्या आहेत.

Mobile talking person
सोन्याची चेन लांबवली की लोक लगेच पोलीस स्थानकात धाव घेतात पण मोबाईल चोरला गेला की असे होत नाही. याचा फायदा या चोरांना जास्त होत आहे. ते आरामात गायब होत आहेत.
बेळगाव शहरात मोबाईल पळवण्याच्या घटना जास्त घडत आहेत. हनुमान नगर, कुमारस्वामी ले आउट, कॅम्प, हिंदवाडी, भाग्य नगर, महानतेश नगर व इतर भागात या घटना घडल्या आहेत.
माळमारुती पोलीस स्थानक हद्दीत धर्मनाथ भवन जवळ या घटना सर्वाधिक घडत आहेत.बऱ्याच नागरिकांनी आपला मोबाईल हातातून काढून घेऊन पळवला आणि ते संख्येने जास्त होते अशी तक्रार दिली आहे.
धर्मनाथ भवन जवळ एक महिलेचा मोबाईल असाच काढून घेण्यात आला. ती मोबाईल वर बोलत होती. मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी तो काढून घेतला आणि ते पसार झाले. थोडावेळ त्या महिलेला काय करायचे तेच समजले नाही. तिने चोर चोर असा आरडाओरडा करे पर्यंत ते चोर दूर गेले होते.
तिने आपल्या ओळखीतल्या एक पोलिसाला ही घटना सांगितली तेंव्हा उगाच पोलीस स्थानकात जाऊ नकोस कायच होणार नाही. फक्त १० हजारचा फोन होता तो मिळणे अवघड आहे नवीन घेऊन टाक असे सांगितले. पोलीस स्थानकात गेलीस तर जास्त त्रास होईल असे पोलिसानेच सांगितले म्हणून मी गेले नाही अशी माहिती तिने बेळगाव live ला दिली.
सध्या पोलीस तीन मोबाईल चोरांना अटक करण्यात यशस्वी झाले असून त्यांनी चोरलेल्या २१० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कटकोळ या रामदुर्ग तालुक्यातील गावातून ही कारवाई करण्यात आली आहे.
साईराम श्रीनिवास पस्तुलेती, किरण राजनेयलू पस्तुलेती व त्याचा भाऊ असलेला श्रीकांत या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही २२ ते २४ वयोगटातील आहेत. हैद्राबाद येथील लिंगमपल्ली गावातील या चोरांकडून साडे दहा लाखाचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
संशयस्पद रित्या फिरताना पोलिसांनी चौकशी करत जवळ गेल्यावर त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. रामदुर्ग तालुक्यात केंद्र बनवून ही गँग काम करत होती.
तिघांना पकडले पण बाकीचे कार्यरत असतील त्यांना पकडून नागरिकांना भयमुक्त करण्याचे आव्हान पोलीस दलासमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.