बेळगाव सीसीआयबी पोलिसांनी दोन दरोडेखोर पकडले असून एक दरोड्याचा तपास लावला आहे.दुर्गामाता दौड मध्ये हजारो युवक युवती पळत असतात या गर्दीत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
राहुल संजय जालगार( वय २०) रा. शास्त्रीनगर आणि उत्कर्ष उर्फ बाबू उर्फ बाब्या सुनील वर्मा (रा. कॅम्प) यांना अटक केली आहे.
याच वर्षी जुलै महिन्यात हेड पोस्ट ऑफिस समोर एक लुटमारीची घटना घडली होती. एक राजस्थानी व्यक्तीला दोघांनी चाकू मारला होता.
आज सकाळी दुर्गामाता दौड सुरू असताना हे दोघे बंदोबस्तावरील पोलिसांना संशयास्पद वाटले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तेंव्हा त्यांनीच ती लूटमार केली होती असे कबूल केले आहे.
याबद्दल कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.