बेळगाव शहरातील जुन्या मंदिरा पैकी म्हणजेच शेकडो वर्षे जुने मंदिर म्हणजे किर्लोस्कर रोड येथील जत्तीमठ दुर्गादेवी मंदिर होय.उत्तर भारतातून दर बारा वर्षातून एकदा नाथ पंथीय साधूंच्या झुंडीचे वास्तव्य या मंदिरात असते बारा वर्षांनी एकदा होणाऱ्या कुंभ मेळ्यास जायच्या अगोदर देशातील नाथ पंथीय साधू किर्लोस्कर रोड वरील मंदिराला भेट देतात आणि येथील देवीचं दर्शन घेऊनच कुंभ मेळ्यास जातात.नाथ पंथीयांचं वास्तव्य इथे होत असल्याने हे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळेच या दुर्गा माता मंदिराला वेगळं विशेष महत्व आहे.
3
या मंदिरात सतत 24 तास धुनी पेटत ठेवली जाते दररोज सायंकाळी नगारा वाजवला जातो. मंदिरातील आत असलेल्या देवीचे तोंड पश्चिमेकडे म्हणजेच सुर्यास्त होतो त्या दिशेकडे आहे हे देखील वैशिष्ट्य आहे.मंदिरा समोरील विहिरीचे पाणी कधीच आटत नाही पूर्वीच्या काळात शहरात दुष्काळ असतेवेळी याच विहिरीतून शहर पाणी पुरवठा होत होता अशीही माहिती आहे.या विहिरीच्या पाण्याला देखील महत्व आहे.
(फोटो: शहराचे प्रथम नागरिक महापौर उपमहापौरानी भेट देऊन आशीर्वाद घेतला)
जत्ती मठ कृती समितीच्या माध्यमातून या मंदिराची देखभाल केली जाते दत्ता जाधव मदन बामणे आदी या कामी पुढाकार घेत असतात.गेल्या बारा वर्षा पासून मंदिरात अनेक बदल केलेला आहे मंदिर जिर्णोद्धार करून दुर्गादेवी बसवण्यात आली आहे.दर वर्षी दसऱ्याला अष्टमीला महा प्रसादाचे आयोजन केले जाते.
दर वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने खास आयोजन केले जात आहे.गेली चार वर्षे मंदिर आवारात मोठी दुर्गादेवी स्थापन करून सजावट करून आरास करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी कोल्हापूरची महा लक्ष्मी देवी,दुसऱ्या वर्षी गजारूढ महा लक्ष्मी, तिसऱ्या वर्षी गरुडारूढ महा लक्ष्मी आरास केली होती या वर्षी 20 फूट उंच सप्तश्रुंगी देवी अवतारांची दुर्गा बनवण्यात आली आहे.दसऱ्याला भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.