महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ युवा समिती ही संघटना म्हणजेच युवकांची एक नवी फळी तयार होत आहे. या समितीच्या अध्यक्षपदी शुभम शेळके तर सचिवपदी श्रीकांत कदम यांची निवड करण्यात आली आहे. नेतेमंडळींना पाठींबा देऊन सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी ही युवा संघटना सज्ज झाल्याचेच हे वातावरण आहे.
समिती आता शिल्लक नाही किंव्हा समिती संपली असे म्हणणाऱ्या लोकांना हा एक इशारा या युवकांनी दिला आहे. मागच्या पिढीने हा प्रश्न का चालवत ठेवला याची जाण आणि भान या तरुणांना आहे. त्यामुळेच हे तरुण महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ राहून कार्यरत होत आहेत. सीमाप्रश्नाला तरुणांचा पाठींबा नाही असे म्हणणाऱ्या लोकांनाही हा एक इशाराच असून तरुणांनी स्वतः हे दाखवून दिले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ युवा समिती यांच्या वतीने रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. शहापूर येथील महागणपती मंदिर नाथ पै चौक येथे झाली. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून नितीन आनंदाचे हे होते. मराठी शाळांना बळकट करणे या मुद्द्यावर काम सुरू झाले आहे. सीमाभागातील पाच मतदार संघातील सरकारी मराठी मुला मुलींची शाळांपैकी प्रत्येक मतदारसंघात एक मराठी शाळेची निवड करण्यात आली आहे. आता हे तरुण या शाळांमध्ये जाऊन काम करणार आहेत.
बेळगाव उत्तर मध्ये मराठी कॅन्टोन्मेंट शाळा कॅम्प,
बेळगाव दक्षिण मध्ये येळ्ळूरवाडी मराठी शाळा व येळ्ळूर मॉडेल मराठी शाळा संयुक्त,
ग्रामीण बेळगाव मध्ये मराठी मुला मुलींची शाळा निलजी,खानापूर मध्ये मराठी मुला मुलींची शाळा जांबोटी.यमकनमर्डी मध्ये मराठी मुला मुलींची शाळा मुचंडी.या शाळांची सरकारी मराठी मुला मुलींची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली.तिथे शिकणाऱ्या मुलांना अडचणी येऊ नयेत म्हणून प्रयत्न करीत आहेत.
तर येत्या एक नोव्हेंबर काळा दिवस या बद्दल चर्चा करण्यात आली आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले व सहभागी होण्याचे ठरविण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता समिती मधील युवकांची संख्या कमी झाली असे बोलणारे वाढले आहेत, तेंव्हा काळ्या दिनाला युवकांची संख्या जास्तीत जास्त होईल यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे.