देश देव आणि धर्माच्या रक्षणासाठी बेळगावात शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आले आहे. रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गा माता दौडी च्या नियोजन संदर्भात बैठक पार पडली शहरातील मार्ग निश्चित करून विविध समस्या व विषयांवर चर्चा करण्यात आली . यंदाच्या दौडी मध्ये सुवर्ण सिंहासन व खडा पहारा या संदर्भात व्यापक प्रमाणात प्रचार करण्यात साठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तालुक्यातील गावांसह नवीन गावांमध्ये दौड नियोजन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्ण सिंहासन साठी 11000 चा धनादेश किरण गावडे यांच्या कडे सुपूर्द केला.शहरातील मार्ग पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.
बुधवार दि 10 रोजी
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर.
गुरुवार दि 11 रोजी
श्री गणेश मंदिर (राणी चनमा चौक) ते श्री दुर्गा माता मंदिर (किल्ला)
शुक्रवार दि 12 रोजी
छत्रपती श्री शिवाजी कॉलनी टिळकवाडी ते महालक्ष्मी मंदिर अनगोळ
शनिवार दि 13 रोजी
बसवाणा मंदिर नेहरूनगर ते श्री जोतिबा मंदिर शिवबसवनगर
रविवार दि 14 रोजी आंबामता मंदिर शहापूर ते बसवेश्वर चौक गोवावेस
सोमवार दि 15 रोजी
शिवतीर्थ मिल्ट्री महादेव ते मारुती मंदिर संयुक्त महाराष्ट्र चौक
मंगळवार दि 16 रोजी
श्री दुर्गा माता मंदिर बसवेश्वर चौक ते श्री मंगाई देवी मंदिर वडगांव.
बुधवार दि 17 रोजी
सोमनाथ मंदिर ताशीलदार गल्ली ते श्री शनी मंदिर
गुरुवार दि 18 रोजी
मारुती मंदिर मारुती गल्ली ते धर्मवीर संभाजी चौक.
जिल्हा प्रमुख किरण गावडे, शहर प्रमुख अजित जाधव,तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, विभाग प्रमुख अनंत चौगुले, चंद्रशेखर चौगुले,अंकुश केसरकर,मोहन ओख,वैभव खाडे,रवी जोशी,विशाल कोकितकर,विजय कुंटे,महेश कुंडेकर,ओंकार पुजारी,प्रमोद चौगुले,मंगेश जाधव, युवराज पाटील,मिथिल जाधव,सागर डोंगरे,महेश पाटील आदी उपस्थित होते.