विजया फुटबॉल अकादमी आयोजित होणाऱ्या विजया ज्युनियर प्रेमीयर लीग फुटबॉल (16 वर्षांखालील मुलांकरिता) स्पर्धेचे मुख्य पुरस्कृत क्रीडा प्रेमी डॉ. रवी पाटील यांनी स्वीकारले आहे.
यावेळी बोलताना बेळगाव फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब म्हणाले यांनी बेळगावात फुटबॉलला अधिक लोकप्रियता आहे. त्यामुळे येथील लोक अजूनही कोणत्याही ऋतूत फुटबॉल हा खेळ खेळतातच.हा खेळ जसा जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे तसा बेळगावताही प्रसिद्ध आहे.
यावेळी पंढरी परब यांनी डॉ रवी पाटील यांचे स्वागत केले. बेळगाव संघटनेचे सेक्रेटरी अमित पाटील, के एस एफ ए बेंगळूरचे सदस्य व्हिक्टर परेरा, डॉ. हॉलपन्नावर, स्पर्धा आयोजक सेक्रेटरी रवी शंकर मालशेट, उपसेक्रेटरी मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ रवी पाटील यांच्या प्रोत्साहना मुळे कर्नाटकामध्ये आता नवीन फुटबॉल चे जाळे वाढणार आहे. डॉ रवी पाटील विजया ज्युनियर लीग मुळे अनेक फुटबॉल पटूंना आता वेगळे व्यासपीठ मिळणार आहे. असे मत यावेळी व्यक्त झाले.