शेतीमालाला हमीभाव मिळवून देतो असे सांगणाऱ्या केंद्र सरकारने अजून तशी सोय केलेली नाही. यासाठी देश पातळीवर आंदोलन केले जात आहे. शेतीशी संबंधित मालावरील कराचा बोजा कमी केला जात नाही तर मग शेतीमालाला जीएसटी लावा आणि या हंगामात उसाला प्रतिटन ४०९६ रुपये दर द्या अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत.
शेती पिकावरील किटकनाशक औषधावर १८% जीएसटी आहे.शेतीसाठी लागणारे बी बियाणे खरेदीवर १२% जीएसटी द्यावा लागतो. शेतीसाठी लागणाऱ्या अवजारावरती २८%, ट्रॅक्टर खरेदीवर २८% तर डिझेल पेट्रोल खरेदीवर ५ पट टॅक्स घेतला जात आहे यामुळे देशभरातील शेतकरी भडकले आहेत.
जर शेतकऱ्यांला प्रत्येक गोष्टी साठी जीएसटी द्यावा लागतो.तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमती जाहीर करताना २८% जीएसटी धरून आधारभूत किंमत जाहीर करावी.अशी मागणी होत आहे. या हिशोबाने सन २०१८-१९ या गाळप हंगामात गाळप होणार्या उसाला एफ आर पी नुसार ३२००/- अधिक जीएसटी 28% याप्रमाणे ४०९६/- रू प्रती टन मिळाले पाहिजेत या मागणीसाठी आंदोलन होणार आहे.