ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस बेळगाव गोवा महामार्गाच्या निर्मितीचे काम हाती घ्यावे अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. अनेकवर्षं विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या रस्त्याचे भाग्य आता उजळणार आहे.
बेळगाव ते खानापूर या टप्प्यात चौपदरी आणि खानापूर पासून पुढे गोव्यापर्यंत दुपदरी असे या रस्त्याचे काम होणार आहे. यापूर्वी हा रस्ता करण्यासाठी एकूण ३७ हजार वृक्षांची कत्तल करावी लागणार होती पण आराखड्यात बदल करून २५ हजार झाडे वाचतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. यासाठी पर्यायी मार्गांचा विचार सुरू करण्यात आला आहे. चोरला घाटातून जाणारा मार्ग तसे आंबोली मार्गे वाहतूक वळवून काम केले जाणार असून त्याची तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
शेतकऱ्यांचा विरोध आणि वनविभागाकडून नाहरकत मिळाली नव्हती म्हणून हा रस्ता विकासापासून रखडला होता पण आता वेळीच काम मार्गी लागणार आहे.