युक्रेन येथील एका पॉवर जनरेशन प्लांट मध्ये अनेक वर्षे बंद पडलेली १२००० किलो वॅट वीज निर्मिती करणारी स्टीम टर्बाइन मशीन दुरुस्त करण्याची जबाबदारी बेळगावच्या लिओ इंजिनिअर्स या फर्म ला मिळाली आहे.
या दुरुस्तीसाठी बेळगावचे अभियंते जयदीप बिर्जे हे युक्रेनला गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पार्टनर अमित कळसकर हे सुद्धा गेले आहेत. ही जबाबदारी सर्वात मोठी आहे.
हे काम मिळाल्याबद्दल संचालक सेर्जी बॉयको आणि ओलॉदिमिर बॉयको यांच्यासह इतरांनी कौतुक केले आहे.
बेळगावच्या तज्ञ अभियंत्यांवर युक्रेनचे ग्राहक खुश असून बेळगावच्या अभियंत्यांना आणखी काम मिळण्याची शक्यता आहे.