इन्फंट्री डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या सायकल मोहिमेला मराठा सेंटर येथून प्रारंभ झाला.
मराठाचे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी सायकलस्वारांना ध्वज दाखवून मोहिमेला शुभेच्छा दिल्या.सायकल मोहिमेत एक अधिकारी आणि नऊ जवान सहभागी झाले आहेत.
बावीस दिवसाचा पाच राज्यातील प्रवास करून 25 ऑक्टोबरला हे सायकलस्वार दिल्लीला पोचणार आहेत.प्रवासा दरम्यान सायकल मोहिमेत सहभागी झालेले सदस्य जनतेशी संवाद साधून तरुणांना सेना दलात सहभागी होण्याचे आवाहन करून जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करणार आहेत.देशभरातील सैन्याच्या तळापासून दिल्लीला येणाऱ्या सायकल मोहिमेतील जवान आणि अधिकारी यांना लष्कर प्रमुख बिपीन रावत हे ध्वज दाखवून मोहिमेची सांगता करणार आहेत.दरवर्षी 27 ऑक्टोबर हा दिवस इन्फंट्री डे म्हणून साजरा केला जातो.