बेळगाव महा पालिकेची निवडणूक पाच महिन्यावर येऊन ठेपली असताना विविध प्रभागातून इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्यामुळे एकेका प्रभागात इच्छुकांची भाऊ गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अलीकडेच बेळगाव शहरात पार पडलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी काही इच्छुकांनी या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच मिरवणूक प्रथमच लांबली गेली.
गणेश चतुर्थी नंतर आता कार्यकर्त्यांना नवरात्रीचे वेध लागलेले आहेत व या माध्यमा द्वारे ठीक ठिकाणी शुभेच्छाचे फलक लावण्याचा सपाटा लावला आहे. असाच एक शुभेच्छा डांबर फासून फलक फाडल्या वरून त्याची नासधूस केल्यावरून प्रभाग क्रमांक 18 मध्ये दोन गटात जोरात संघर्ष झालाय.या दोन्ही गटातील प्रमुख इच्छुक असून गेल्या सहा महिन्या पासून उभयतां मधील संघर्ष अधिक वाढतच चालला आहे.काही इच्छुकांनी महिला मतदारांना वश करून घेण्यासाठी निलगार गणपतीचं दर्शन घडवलं आहे तर काही जण महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सहली आयोजित करण्याच्या तयारीत आहेत.
प्रभाग 18 मधील चित्र शहरातील अन्य वार्डात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे 58 प्रभागातील काही इच्छुक आपल्या प्रभागात फिरून कार्यकर्त्यांशी संपर्क साधून चाचपणी करीत असल्याचे चित्र दिसते.इतकेच काय तर सार्वजनिक गणेश मंडळाला अधिक देणगी कोण देतो यावरूनही इच्छुकांत चढा ओढ झाल्याचे चित्र दिसते काही वार्डा मध्ये इच्छुक उमेदवार प्रमुख कार्यकर्त्यांना खूष प्रयत्नात आहेत.
पालिकेच्या राजकारनात किंग मेकर ची भूमिका बजावलेले माजी महापौर माजी आमदार संभाजी पाटील यांनी आपणही नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे एकूणच महा पालिका निवडणुकीच्या घडामोडीं शहरात आता पासूनच गतिमान झाल्या आहेत.