मराठी तालुका पंचायत सदस्यांना केवळ बैठकीच्या नोटिसाच मराठीतून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांनी इतिवृत्त मराठीतून देण्याची मागणी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी सभागृहात केली. तसा ठरावही मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठीबाबत आवाज उठविण्यात आला.
तालुका पंचायत सभागृहात मराठी कागदपत्राबाबत बरीच चर्चा करण्यात आली. यावेली सुनील अष्टेकर आणि उदय सिद्दन्नावर, रावजी पाटील, काशिनाथ भरमोजी, नारायण नलवडे, आप्पासाहेब कीर्तने, मनीषा पालेकर, लक्ष्मी मैत्री आदीनी यावेळी आवाज उठवला.
प्रारंभी नूतन कार्यकारी अधिकारी पदमजा पाटील यांचा सर्व सदश्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मागील अनेक वर्षापासून जी मागणी करण्यात आली आहे ती मागणी उशिरा का होईना मंजूर करण्यात आली. यापुढे तालुक्यातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी मराठीतून कागद पत्रे द्यावीत असा ठराव करण्यात आला आहे.
कडोली येथील मास्टर प्लॅनलाही विरोध करण्यात आला आहे. जर रस्ता रुंदीकरण करायचा असेल तर पहिला ज्यांची घरे त्यामध्ये जाणार आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा ठराव करण्यात आला आहे. आणि याबाबत नको ते सांगून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे ते थांबवावे, असेही ठरावात म्हटले आहे.
आज झालेल्या तालुका पंचायत बैठकीत मराठी सदस्यांनी आपला आवाज उठवून सभागृह पुन्हा एकदा हादरवून सोडले.