तालुका पंचायत सर्वसाधारण सभा सोमवार दि १ रोजी घेण्यात येणार आहे. मात्र ही सभा गोंधळ माजविणारी ठरणार आहे. अध्यक्ष शंकर गौडा पाटील यानी तालुका पंचायतीचे सदस्य महंतेश अलाबादी यांना कोणतेही अनुदान मंजूर न करता परस्पर आपल्या कार्यक्षेत्रात वळवून घेतले आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तालुका पंचायत मध्ये समांतर निधी वाटपावरून मोठा गोंधळ उडाला होता. आता परत याचा कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. बडसचे तालुका पंचायत सदस्य अलाबादी यांना कोणताच निधी मंजूर करण्यात आला नाही. त्यामुले अलाबादी यानी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना घेऊन बैठकीच्या वेळी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१८-१९ सालासाठी सर्वसाधारण नीधी म्हणून १ कोटी व इतर अनूदानातून निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील सर्व निधी समांतर वाटण्यात आला आहे. तर अधिकारी वर्गाने केवळ अलाबादी यांना या निधीतून वगळले आहे. याचा संताप आता लवकरच दिसून येणार आहे.
याबाबत अलाबादी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली असता त्यानी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. अध्यक्ष यांनी जाणून बुजून आपल्याला डावलले आहे. कारण चुकीचे काम करणाऱ्यावर कारवाई करण्याचे सांगितल्यामुळे त्यांनी असे कृत्य केले आहे. आपण बैठकीत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.