अभ्यास ही एक अशी गोष्ट आहे की ती एकाग्रतेने करावी लागते. अभ्यास करताना मन एकाग्र होण्यासाठी अनेकजण अनेक उपाय करतात. कुणी तंबाकू खातो, कुणी नाशीपुडी वापरतो तर कुणी सिगरेट किंव्हा दारू पितो. असाच अभ्यास करत असताना दारू पिलेल्या एकाला अंगलट आले असून त्याने तो अभ्यास अर्धवट सोडून देऊन परत घरी येण्याचा निर्णय घेतला व आपला परतीचा प्रवास देखील सुरू केला.
हे सारे कुठल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले नसून एक नगरसेवक महोदयांच्या बाबतीत घडले आहे. सध्या नगरसेवकांचे पथक सिमला दौऱ्यावर आहे. तेथे होत असलेला विना उसंत अभ्यास करताना त्या नगरसेवकाचे मन लागत नव्हते. म्हणून त्यांनी दारूचा आधार घेतला पण दारू जरा जास्तच झाली आणि एवढ्यात दुसऱ्या एक नगरसेवकाने त्याचा फोटो काढण्याची नक्कल केली, यामुळे पारा भडकून त्याने हा दौरा अर्धवट टाकून परत येणे पसंत केले आहे.
या गोष्टीची सध्या जोरात चर्चा आहे. ही घटना घडल्यानंतर आणखी एक वडगाव भागातील नगरसेवक दारू पितानाही अशीच घटना घडल्याची चर्चा आहे.
अभ्यास करताना दारू पिणाऱ्यांचे फोटो काढून पाप त्यांना उगीच त्रास देणाऱ्याबद्दल नाराजी आहे. थंड हवेच्या ठिकाणी थोडी पिली तर काय झाले? अभ्यास तर होतोय ना? अशी प्रतिक्रिया नगरसेवकांनी द्यावी लागेल.