आज बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांना एकच सांगायची वेळ आली आहे. अंगडी साहेब सगळं श्रेय तुम्हीच घ्या पण आम्हाला त्रासात घालू नका आणि अडचणीत आणू नका…..
कारण काय? अंगडी साहेबांनी सध्या एक फतवा काढला आहे. १५ ऑक्टोबर पासून तुम्ही थर्ड रेल्वे गेटवर ओव्हर ब्रिज बांधा असा हा फतवा आहे. एकीकडे ब्रिटिशकालीन ओव्हर ब्रिज चे काम संपलेले नसताना हा फतवा म्हणजे लोकांना वेठीला धरण्याशिवाय दुसरे काय? माझ्या काळात सगळी ब्रिज झाली असे श्रेय अंगडींना लाटायचे आहे त्यासाठी बेळगाव शहरातल्या नागरिकांना कितीही त्रास झाले तरी त्यांना चालणार आहेत.
आज बेळगावच्या सतीश तेंडुलकर यांनी अंगडीं याांना चांगलेेेच अडचणीत टाकले असून जुने ब्रिज पूर्ण झाल्यावरचं बांधायला घ्या असा सल्ला त्यांनी दिला आहे. खासदार अंगडींना हे कळत नाही काय ते नाटक करत आहेत? हे मात्र त्यांनाच ठाऊक .
अंगडी साहेब जरा मोटार सायकल वरून फिरा आणि जनतेचे त्रास ओळखा. खासदारकीच्या निवडणुकी आधी जर का तुम्ही हे गोंधळ घालायचे बंद केले नाही तर यावेळी तुम्ही निवडून येणे कठीण आहे. जास्त ब्रिज बांधले तर मते जास्त पडतील हा तुमचा भ्रम आहे. जरा शहाणे व्हा आत्ता.
मोदींची लाट दरवेळी येत नाही जरा लोकांची काळजी घ्या नाहीतर यावेळी चुकून निवडून यायची शक्यता कमी आहे.