बेळगाव महा पालिकेचे 45 हुन अधिक नगरसेवक हिमाचल प्रदेश येथील सिमला महा पालिकेच्या स्टडी टूर वर गेले आहेत.एकीकडे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे महा पालिकेचे 100 कोटी अनुदान अजून आलेले नाही मात्र अश्या स्थितीत पालिकेचा खजिन्यावर भार देत नगरसेवकांनी सिमला टूर केली आहे.
मागील महिन्यात सिमला नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने बेळगाव पालिकेस भेट देऊन महापौर उपमहापौरा सह सर्व नगरसेवकांना सिमला पालिकेला भेट देण्याचं आमंत्रण दिले होते. त्यानुसार सिमला दौऱ्याचा ठराव देखील पालिकेत करण्यात आला होता.दोन व्ही आर एल कंपनीच्या बस बुक करून 45 हुन अधिक नगरसेवक बेळगाव हुन मुंबईकडे तर मुंबईहून चंदीगड मार्गे विमानाने सिमला अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ते सिमला येथे पोचतील .
गेल्याच वर्षी नगरसेवकांनी चंदीगड अभ्यास दौऱ्यात चंदीगड शहरातील एस टी पी प्लांट, स्वच्छता कचरा निवारण याची माहिती घेतली होती मात्र त्यावेळी अभ्यास दौऱ्याच्या नावावर नगरसेकांनी चैनी करून पालिकेच्या निधी वाया घालवला असा आरोप झाला होता.शहरातील रस्ते खराब झाले जनता खड्डे असलेल्या नॉन मोटरेबल रस्त्यावरून प्रवास करत असताना नगरसेवक मात्र स्टडी टूर च्या नावावर मौज करण्यासाठी सिमला दौऱ्याला गेले असल्याचा आरोप होत आहे.
बेळगाव महा पालिकेच्या वतीने नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेला सिमला अभ्यास दौरा हा कन्नड भाषेतील म्हण “यारादरे दुड्ड यल्लम्मन जात्रे” या प्रमाणेच आहे . केंद्र सरकारने वादग्रस्त अश्या बेळगाव शहरास स्मार्ट सिटी चा दर्जा दिलाय हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असताना सिमला दौरा म्हणजे निव्वळ पैश्यांची उधळपट्टीच आहे असा देखील आरोप होत आहे.