बेळगावच्या पारंपारिक गणेशोत्सवात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न झाला तरी सारी परिस्थिती योग्य पणे हाताळून उत्सवात सामान्य नागरिकांच्या सूरक्षेवर भर दिल्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने बेळगाव पोलीस दलाचे आभार मानले आहेत.
पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. नागरिकांनी सुरक्षितपणे हा सण साजरा केला आपले योगदान मोठे आहेत असे सांगून त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि शाल घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.
पी आर ओ विकास कलघटगी, रणजित चव्हाण पाटील, सतीश गौरगोंडा, गणेश दड्डीकर, शिवराज पाटील यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.