ज्युनियर लिडर्स विंग हेडक्वार्टरतर्फे दोन दिवसांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ज्युनियर लिडर्स विंगचे कमांडन्ट मेजर जनरल संजय सोई यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
मेजर जनरल संजय सोई यांनी दोन्ही संघातील खेळाडूंचा परिचय करून घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कर्नल राजू जॉर्ज,लेफ्टनंट कर्नल बी.एस.वर्मा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.जे.एल.विंग,पी.सी.विंग,कमांडो विंग आणि एम.टी. डेट या ज्युनियर लीडर विंगमधील चार संघांनी स्पर्धेत भाग घेतला आहे.