Saturday, December 21, 2024

/

बेरोजगारांच्या जीवावर गटारीतले पैसे खाऊन मनपा आरोग्य विभाग जगतोय!

 belgaum

महानगरपालिकेचा कारभार कसा भ्रष्ट आहे याची उदाहरणे नेहमीच समोर येत असतात. कुठूनही आणि कसेही मिळतील तिथून पैसे खायला मनपाचे अधिकारी मागे पुढे बघत नाहीत. मनपा आरोग्य विभागातील असाच एक मोठा भ्रष्टाचार समोर येऊ लागला आहे.

बेरोजगार महिला आणि पुरुषांच्या नावाखाली एक कंत्राटदार दरमहा लाखो रुपये कमवत आहे. हा गटारीतला पैसा खाण्यात त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही साथ मिळत आहेत.

बेळगाव शहरातील गटार स्वच्छ करण्याचे काम करून देण्याचे काम मनपा अधिकाऱ्यांनी त्या कंत्राटदाराकडे दिले आहे. हा कंत्राटदार कायम स्वच्छतेचे काम करण्यासाठी हंगामी कामगार नेमतो. यासाठी त्याच्याकडे काम दे अशी मागणी करण्यासाठी कायम महिला व पुरुष कामगारांची गर्दी असते. अशा बेरोजगार लोकांची नावे आणि पासबुके घेऊन त्यांना कामावर न घेता तसेच त्यांना पगारही न देता दरमहा एक व्यक्तीच्या नावावरून १० ते १२ हजार रुपये हा कंत्राटदार खाऊ लागला आहे. या भ्रष्ट कारभारात काही बँक अधिकारी आणि मनपाचे अधिकारीसुद्धा सहभागी आहेत अशी माहिती बेळगाव live कडे मिळाली आहे.

संबंधीत कामगारांकडे त्यांच्या खात्यावर जमा होत असलेली रक्कम आणि काढण्यात आलेली रक्कम याबद्दलचे पुरावे आहेत. संबंधीत कंत्राटदाराला दुसऱ्यांच्या खात्यावरील पैसे बँकेतील अधिकारी कसे देतात याचीही चौकशी होण्याची गरज आहे. विचारण्यास गेले असता हा कंत्राटदार दादागिरी करत आहे. आपण बाळगून ठेवलेले नाथ पै सर्कल आणि परिसरातील गुंड तो पाठवून गुंडगिरीही करू लागला आहे अशी तक्रार होत आहे.

याबद्दल पोलीस स्थानकात तक्रार देण्याचा प्रयत्न झाला असून गुंडगिरीच्या भीतीने कामगार पुढे येत नाहीत. सध्या त्याने जमविलेली संपत्ती करोडो च्या घरात असून त्याची व त्याला साथ देणाऱ्यांची एसीबी आणि लोकायुक्त विभागांनी चौकशी करावी अशी मागणी केली जाणार आहे.
मनपाने कारवाई न केल्यास या प्रकरणात गुंतलेल्या सर्व अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची तयारी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.