उत्तर कर्नाटक वेगळं राज्य करा अन्यथा विकास करा अशी मागणी करून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या करत विकास करा अश्या मागणीच्या निवेदनाचा स्वीकार मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केला.
दुपारी तीन वाजता सुवर्ण सौध मध्यें सुरू होणारा मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा जनता दर्शन कार्यक्रम दोन तास उशिरा सव्वा पाच वाजता सुरू झाला तब्बल चार तास रात्री नऊ वाजे पर्यंत चालला.या जनता दर्शन मध्ये एकूण 1271 जणांनी आपली तक्रार मुख्यमंत्र्यां पर्यंत पोचवण्यासाठी नोंदणी केली होती.
अनेक जण पर गावाहून आलेले ,स्वतः मुख्यमंत्री आपली तक्रार ऐकून घेतील म्हणून अपंग आशेने सुवर्ण सौधच्या दक्षिण द्वारा वाट पहात होते अश्या बऱ्याच जणांच्या तक्रारी कुमारस्वामी यांनी ऐकून घेतल्या.शेतकरी महिला आदींच्या तक्रारी ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांना यात लक्ष घाला अश्या सूचना
दिल्या.
शपथविधी नंतर ते पहिल्यांदाच बेळगावला आले होते तेही एका शिक्षण संस्थेच्या हिरक महोत्सवात सहभागी होण्यासाठी रात्री नऊ पर्यंत चार तास जनता दर्शन घेऊन मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी तक्रारी ऐकल्या.
राज्यात शेतकऱ्यांचे 54 हजार कोटी कर्ज माफ करण्यासाठी पुढे येत असून कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या खाजगी संस्था आणि बँकांवर कारवाई करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बजावला. जर कुणी बँक मॅनेजर शेतकऱ्यांना नोटिशी बजावत असेल तर त्यांच्यावर देखील केस दाखल करा अश्या सूचना देखील अधिकाऱ्यांना बजावल्या.
मला सर्व तक्रारी ऐकता आल्या नाहीत मात्र उरलेल्या सर्व तक्रारी बंगळुरूला घेऊन जाऊन अभ्यास करतो असे शेवटी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.
बेळगाव जिल्ह्यातील राजकारण योग्य रित्या सुरू असून काँग्रेस मधील कुणीही पक्ष सोडून जाणार नाही असा दावा त्यानी केला.