Monday, December 23, 2024

/

‘बेळगावकारांनो माना राष्ट्रपतींचे आभार’

 belgaum

पीआरओ, म्युजीएम, राष्ट्रपतींचे सचिवालय, राष्ट्रपती भुवन, नवी दिल्ली- ११०००४
आणि इमेल अड्रेस आहे
[email protected]

तुम्ही म्हणाल बेळगाव live ने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा हा पत्ता का बरे दिला? राष्ट्रपती तर उद्या बेळगावला येत आहेत आणि त्यांचा पत्ता घेऊन करायचे काय? ते येत आहेत म्हणून रस्ते सुधारले आहेत म्हणून त्यांना पत्र लिहा आणि त्यांचे आभार माना. प्रत्येक बेळगावकाराने राष्ट्रपतींचे आभार मानायलाच पाहिजेत.

pres-visit2
के एल एस सोसायटीने कार्यक्रम ठेऊन राष्ट्रपतिजींना बोलावले हे बेळगाव शहरावर मोठे उपकार झाले आहेत. राष्ट्रपतींचा दौरा नक्की झाला आणि बेळगावचे झोपलेले अधिकारीही जागे झाले. त्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती काम हातात घेतले आणि किमान गाड्या जाऊ शकतील असे रस्ते मिळू शकले आहेत. राष्ट्रपती जर येत नाही म्हटले असते तर रस्ते तसेच राहिले असते म्हणून त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत.
सांबरा विमानतळ ते उद्यमबाग पर्यंतचे सर्व रस्ते सुरळीत झाले आहेत. सगळे खड्डे भरण्यात आले. रात्रीच्या रात्री दुभाजकांना आंघोळ घालण्यात आली. त्यांची रंगरंगोटीही करण्यात आली. दुभाजकांवर फुले लावलेली झाडेही आली. ही सगळी राष्ट्रपतींची कृपा आहे.
जे काम माध्यमांच्या तिखट बातम्यांनी केले नाही, जे काम आंदोलनांनी केले नाही, जे काम अपघात झाले आणि गाड्या अडकल्या तरी झाले नाही ते काम राष्ट्रपतींनी करून दाखवले आहे. त्यांचे आभार माना.
पुढील बातमीत नक्की देऊ बेळगावकरांचे राष्ट्रपतींना पत्र चा एक नमुना या नमुन्याची प्रिंट आपण वरील पत्त्यावर राष्ट्रपतींना पाठवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.