Friday, April 19, 2024

/

‘मुस्लिम बांधवांनीही केले गणेशाचे स्वागत’

 belgaum

देव सगळ्यांचाच एक आहे. धर्म पंथ वेगवेगळे असले तरी दुसऱ्याच्या धर्माचा आणि देवतेचा आदर जो करतो तोच खरा मानवतावादी ठरतो. असाच आदर्श बेळगाव मधील जालगार गल्लीतील मुस्लिम बांधवानी घालून दिला आहे. गल्लीतील सार्वजनिक बाप्पांचे स्वागत करून त्यांनी हम सब एक है। चा संदेश दिला आहे.

Jalgar galli

जालगार गल्लीतील गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा सुरू असताना हे मुस्लिम तरुण पुढे आले. त्यांनी मंडळाचे आणि मंडळाच्या गणेशाचे स्वागत केले. हजरत रावत, कादर रावत, तौसिक राजगोळी, इम्रान जमादार , इदिल देसाई, सकेब जमादार, जाफर बडगेरी हे ते तरुण होते.
महामंडळाचे सुनील जाधव आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांचे हे स्वागत स्वीकारले आणि जल्लोष केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.