केवळ दोन दिवस असलेल्या बाप्पाच्या आगमनापूर्वी शहरात रस्त्यावरील खड्डे बुझवण्याचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार मार्ग संस्थेने महापौर उपमहापौरांकडे केली आहे.
सोमवारी महापौर बसप्पा चिखलदिनी आणि उपमहापौर मधूश्री पुजारी यांची भेट घेऊन वरील तक्रार केली आहे.न्यू गुड्स शेड रोड येथे चिपिंग खड्ड्यां बाहेर टाकण्यात आली आहे त्यामुळे याची पहाणी करावी अशी मागणीही करण्यात आली.
शाडूच्या मूर्तीची भूमिका स्वागतार्ह आहे मात्र बेळगावातील खड्ड्यांमुळे शाडूच्या मूर्तींना तडा जाऊ शकतो. मार्ग संस्थेच्या वतीने कपिलेश्वर उड्डाण पुलावरील स्वच्छता अभियानात गोळा केलेल्या मातीची उचल करा अशी विनंती केली.यावेळी माजी महापौर किरण सायनाक,अप्पसाहेब पुजारी,नगरसेवक रमेश कळसनावर,मनोहर हलगेक आदी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांचे काम दुय्यम दर्जाचे झाले आहे म्हणून खड्डे बुजवायची वेळ आली आहे खड्डे बुजवताना देखील असे प्रकार होत असल्याने महा पालिका अधिकारी आणि लोक प्रतिनिधी कडून कोणती अपेक्षा करावी?असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.हे खड्डे बेलगाम असतील कधी खड्डे मुक्त बेळगाव पहायला मिळणार?