अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी बेळगावातील एच आय व्ही बाधित मुलांच्या संस्थेस दहा लाखांची मदत दिली आहे.
महेश फौंडेशन असं या संस्थचे नाव आहे.
दस का दम या कार्यक्रमात जिंकलेली रक्कम बेळगावातील एका संस्थेस देणार असल्याची त्यांनी कार्यक्रम दरम्यान घोषणा केली होती मात्र संस्थचे नाव गुपित ठेवले होते बेळगाव live ने देखील ही बातमी प्रसिद्ध केली होती मात्र त्यानंतर काहीच हालचाली न झाल्याने थोडा संशय देखील निर्माण झाला होता.आता शिल्पा शेट्टी यांनी आपण बोललेले शब्द खरे करून दाखवले आहेत.
शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांनी महेश फोऊंडेशन बरोबर करार केलाअसून दस का दम या कार्यक्रमात जिंकलेली दहा लाखांची रक्कम त्यांनी दिली आहे.महेश फौंडेशन आणि शिल्पा शेट्टी यांच्यात करार झाला आहे.शेट्टी यांनी दर महिना या संस्थेस एक रक्कम देणार आहेत त्याद्वारे शाळा मुलांचे आरोग्य,देखभाल आदी ते पैसे खर्च केले जाणार आहेत.
2010 पासून महेश फौंडेशन ही संस्था कार्यरत असून 40 अनाथ एच आय व्ही बाधित मुलांचा सांभाळ करत असते याच बरोबर जिल्ह्यातील 4 हजार मुलांना शिक्षण तर एक हजार झोपडपट्टीतील मुलांना आरोग्य सुविधा पुरवत असते.या संस्थेचे अध्यक्ष महेश जाधव यांना राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.