गणेश फेस्टिव्हलच्या महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांना महिला आणि तरुणींचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.मेहंदी काढण्याच्या स्पर्धेत तरुणी आणि महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.प्लास्टिकला पर्यायी पिशवी तयार करण्याच्या स्पर्धेत महिलांच्या नवनिर्मितीच्या कलेचे दर्शन घडले.
पाककृती स्पर्धेसाठी उपवासाच्या पदार्थांची थाळी असा विषय देण्यात आला होता.साबुदाण्याची खिचडी,वडे,इडली,वरीच्या पिठाच्या इडल्या,भाजी,फळापासून तयार केलेले खाद्यपदार्थ,विविध प्रकारची थालीपीठे, आंबोळी, बटाट्याची भजी,लाडू,चकली,मोदक असे अनेक पदार्थ महिलांनी पाककला स्पर्धेत सादर करून त्याची कृतीही सादर केली होती.
दरवर्षी गणेश फेस्टिव्हलतर्फे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.