एशियन गेम्स मध्ये सहभागी व्हायला जाण्याअगोदर म्हणजे कझाकस्तानला प्रशिक्षणासाठी जायच्या दोन दिवस अगोदर इंडियन एक्सप्रेसचे रिपोर्टर तुषार मजुकर आणि मी मलप्रभाच्या घरी तुरमुरीला गेलो होतो.सोबत तिचे कोच जितेंद्र सिंह देखील होते…त्यावेळी तिने आम्हाला म्हटलं होतं..’सर मी मेडल घेऊन येणारच’असा जबरदस्त आत्मविश्वास तिच्यात झळकत होता.
त्याची जाणीव आम्हाला झाली होती. तुषार यांनी आम्ही बेळगावला परतते वेळी म्हणून दाखवलं होत ती जिंकेल.अन तीने तो शब्द खरा करून दाखवला..
ज्यूडो मधल्या कुरास या प्रकारात ५२ किलो महिला वजन गटात कांस्य पदक मिळवून दिले. तसें कुरास हा प्रकार हा खेळ अगदी नवीनच आहे आणि बऱ्याच जणांना या खेळा बद्दल अजूनही माहिती नाही. मुख्यतः कझाकस्तान मधला हा खेळ भारतात पसरतोय या नवख्या खेळात देशाला दोन पदक मिळालेत त्यातील एक पदक बेळगावच्या कन्येने मिळवून दिलंय याचा सर्व बेळगावकराना अभिमान वाटायला हवा.
एकलव्य पुरस्कार अनेक राष्ट्रीय स्पर्धातील सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय स्पर्धातून मिळवलेल्या यशा नंतर मलप्रभा पहिल्यांदाच एशियन स्पर्धेला जाणार होती. त्यातच कझाकस्तान येथे जाऊन प्रशिक्षण देखील पूर्ण करायच होतं अश्यात तिला अर्थिक मदतीची गरज होती बेळगावातील सर्वच वर्तमानपत्रांनी, मिडीयाने मलप्रभेला आर्थिक मदतीचे आवाहन केलं होतं.थोडे पैसे जमले होते राजकारण्यांनी तुटपुंजी आर्थिक मदत केली काहींनी केवळ आश्वासन दिलं होतं मात्र ती जमलेली रक्कम अपुरी होती अश्यात प्रशिक्षक जितेंद्रसिंह यांनी बोजा उचलत पुढचा दौरा केला होता. हे त्रिवार सत्य आज मेडल मिळाले की खेळाडूचे यश दिसते मात्र यामागे प्रशिक्षकांची मेहनत अतुलनीय आहे हेच जितेंद्र सिंह यांच्या बाबत म्हणावे लागेल.
एशियन गेम मध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूस नोकरी हवी. या गेम मधील मलप्रभाच्या सगळ्या मॅच केंद्रीय खेळ मंत्री राज्य वर्धन सिंह राठोड यांनी पाहिल्या आहेत त्यामुळं तिचा नोकरीचा प्रश्न मिटेल पण पुढील स्पर्धासाठी इथून पुढे शासकीय मदत मिळेल अशी आशा करूयात.बेळगावच्या या कन्येने ज्यूडोत मिळवलेल्या यशामुळे तिचं पुन्हा एकदा अभिनंदन…
आज तिने बेळगावला आनंदाचे अश्रू दिलेत. तिच्या आई वडिलांना जितका आनंद झाला असेल तितकाच आनंद साऱ्या बेळगावला आज झाला आहे.
मलप्रभा #hatsoffmalprabha