धुमशान सुरू असलेल्या पीएलडी बँकेच्या निवडणूकमुळे तहसीलदार कार्यालयाजवळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. डीसीपी सीमा लाटकर या स्वता जातीने या ठिकाणी लक्ष देत आहेत. त्यामुळे सध्या तरी वातावरण शांत आहे.
पोलिसानी रिसालदार गल्ली येथील रहदारी आता दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे इतरत्र त्याचा फटका इतर मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पोलिसांच्या छवणीचे स्वरूप आले होते.
सध्या या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगण्यात आला. अक्का विरुद्ध सावकार अशी झुंज लागली असताना याचे विपर्यास भांडणात नको अशी याची काळजी घेण्यात आली आहे. डीसीपी सीमा लाटकर या स्वतः त्या जागी थांबून लक्ष देत आहेत.
पी एल डी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलल्याच्या विरोधात सोमवारी मध्य रात्रीपर्यंत आंदोलन केले होते मात्र अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्या वर आंदोलन मागे घेतले होते.14 पैकी 9 सदस्यांना सोबत घेऊन आमदार हेब्बाळकर यांनी आंदोलन केले होते. सदस्याचे अपहरण झाल्याची तक्रार आल्या मूळ अध्यक्ष पदाची निवडणूक पूढे ढकलली असल्याचे कारण पुढे येत होते.