कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचा बोजवारा उडाला आहे. वेळेत डागडुजी पूर्ण न केल्यामुळे हा फटका बसत आहे. तेंव्हा यापुढेतरी ही जलशुद्धीकरण केंद्रे सुरळीत करावीत अशी मागणी केली जात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ३५० हुन अधिक केंद्रे कुचकामी ठरली आहेत. पिण्यासाठी नागरिकाना शुद्ध पाणी पुरवठा करावा असा संकल्प ठेऊन ही केंद्रे उभारण्यात आली होती. मात्र ती आता असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली खरी पण या केंद्रात पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही.
त्यामुळे अनेकवेळा नागरिकांना खाली हात फिरावे लागते. अशा प्रकारामुळे देखील नागरिकांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ही जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे ही केंद्र कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपयांची नासाडी करून प्रशासन काय साध्य करणार आहे. त्यामुळे की केंद्रे कोणत्या गावात गरजेची आहेत त्या ठिकाणीच ती बसवावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या बंद पडलेल्या केंद्राचे पुढे काय करणार? याकडेही जिल्हा पंचायतीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.