Thursday, May 2, 2024

/

‘विदेशीना ग्रुप मध्ये जोडणे अडमीनला पडले महागात’

 belgaum

व्हाट्स अप्प ग्रुप तयार करून त्यात दोन विदेशीना अड केल्यावर त्या सदस्यांनी देशविरोधी आणि दोन गटात तेढ निर्माण केल्याचा संदेश पाठवल्या नंतर ग्रुप अडमीनला बेळगावात अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी अक्षय राजेंद्र अल्गोडीकर वय 20 रा.महावीरनगर उद्यमबाग असे या ग्रुप अडमीनचे नाव आहे.

Whts app

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय याने
एक व्हाट्स अप्प ग्रुप तयार केला होता त्या ग्रुप ला स्टार ग्रुप असे नाव देऊन ग्रुप मध्ये शेजारील देशाच्या सदस्यांना जोडले होते त्या विदेशी सदस्यांनी दोन धर्मियांत तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली ग्रुप सोडला मात्र ग्रुप अडमीन असणाऱ्या अक्षयने ग्रुप वर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही याहून उलट देश विरोधी पोस्ट टाकणाऱ्या त्या विदेशीना पुन्हा ग्रुप मध्ये समविष्ट केले.

 belgaum

ग्रुप अडमीनने दोन गटात तेढ निर्माण करणाऱ्या सदस्यांना काढून टाकणे गरजेचे होते खुलासा देणे गरजेचे असते मात्र अक्षयने तसे न करता त्या देश विरोधी पोस्ट टाकणाऱ्याना पुन्हा अड् केले म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलिसांनी स्वतः होऊन अक्षय वर गुन्हा दाखल केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.