कारगिल जवळ असलेले ७०७७ मीटर म्हणजे २१२३१ फूट उंच माऊंट कुन हे शिखर मराठा लाईट इंफन्ट्री च्या शूर जवानांनी सर केले आहे. अतिशय अवघड टोक असलेले हे शिखर मानले जाते. एव्हरेस्ट सर करण्यापूर्वी एक मोठे शिखर पार करून मराठा ने शान वाढवली आहे.
लेफ्टनंट कर्नल योगेश धुमाळ यांनी या पथकाचे नेतृत्व केले. मराठा च्या २५० वर्षीय वाटचालीच्या निमित्ताने हे कार्य करण्यात आले आहे.
पुणे येथील सदर्न आर्मी कमांडचे प्रमुख जनरल डी आर सोनी यांनी १७ जुलै रोजी या पथकाला चालना दिली होती.
अतिशय खडतर प्रवास करीत या पथकाने हे शिखर सर केले आहे. २० ऑगस्टला मराठा चा ध्वज या शिखरावर फडकवण्यात आला.