मृत्यूचा साफळा बनत चाललंय सिव्हिल हॉस्पिटल
अनेक वरिष्ठ डॉक्टरांची खाजगी प्रॅक्टिस
तीन राज्यांच्या सीमेवर असलेलं बेळगाव जिल्हा रुग्णालय हळूहळू पेंशंटना मृत्यूचा साफळा बनत चाललंय, अनेक रुग्ण या हॉस्पिटलवर अवलंबुन असताना सिव्हिल हॉस्पिटल आणि तिथले कर्मचारी रुग्णांची सेवा करण्यापेक्षा त्यांच्या गैरसोयिकडे भर देत आहेत.सिव्हिल हॉस्पिटल मधून दाखल झालेला रुग्ण वाचण्यापेक्षा मरून बाहेर पडत आहेत.
बिम्स झाल्यापासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.बऱ्याचदा डॉक्टर आपल्या खासगी प्रॅक्टिस मध्ये व्यस्त असतात यामुळे रुग्ण वाऱ्यावर आहेत.लोकायुक्त भेट देऊन ताशेरे ओढले असले तरी इस्पितळात काहीच फरक पडला नाही.
दोन अर्भकाच्या उपचारात हेळसांड झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड आणि दगडफेक करण्याच्या घटना घडल्या आहेत. स्वतःच्या खासगी प्रॅक्टिसवर डॉक्टर भर देऊ लागले असून रुग्णाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही होत आहे.