शिवापूरला जाताना आता काळजी घेतली पाहिजे. शिवापुरला जातानाच गावच्या सुरुवातीपासून ते गाव संपेतो वर रस्त्यातून जाताना चिखलाने माखलेल्या राष्ट्यावरीन जीव मुठीत घेऊन जायला पाहिजेत. त्यामुळे कोणी प्रवाशी येथून जाताना प्रत्येक प्रवाशाला सांगत आहेत की शिवापुरला जातंय सावधान.
सुमारे अर्धा किलो मीटर रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पावसात तर चिखलाने हा रस्त्यावर अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करताना काळजी घ्यावी लागते आहे.
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मतदार संघात हे गाव येते. दरम्यान मधनतारी या गावातील नागरिकांनी वांजमिनीबाबत आमदारांकडे जमिनी वाचविण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी जेवढे जणांनी मला मतदान केले आहेत त्यांच्याच जमिनी वाचवू, असे सांगून नागरिकांची बोलावणूक केली होती. आता रस्त्याकडे ते लक्ष देत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान रस्त्याची अवस्था पाहता येथून ये जा करणेही जीवावर उधार होणेच आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी नागरिक आंदोलन करण्याचा तयारीत आहेत. त्यामुळे हा रस्ता करावा अशी मागणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी. आणि पावसाळ्यानंतर रास्ता करावा. या परिसरात साखर कारखाना सुरू आहे. त्यामुळे ऊस घेऊन येणारी वाहनाची संख्याही अधिक आहे. त्यामुळे हा रस्ता करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.