Thursday, November 28, 2024

/

‘गजकर्ण – वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स’

 belgaum

Gajkarnगजकर्ण हा एक संसर्गजन्य त्वचाविकार आहे. या विकारात एक प्रकारची बुरशी त्वचेवर वाढते. विकाराचे स्वरुप गंभीर नसले तरी किळसवाणे असते. बुरशीच्या प्रकारानुसार चट्ट्याचे रंग दिसून येतात. टिनिया अल्बा (पांढर्‍या रंगाची बुरशी-चिब), टिनिया व्हार्सिकलर (गुलाबी लालसर चट्टा दाद), टिनिया नायग्रा (त्वचा एकदम काळपट खरखरीत होणे) असे प्रकार आढळून येतात.
कारणे आणि लक्षणे
उन्हाळ्यात भरपूर घाम येत असतो. अशावेळी स्वच्छता राखली न गेल्यास गजकर्ण उद्भवते. पावसाळ्यात न वाळलेले ओलसर दमट कपडे घातल्याने संसर्ग होऊ शकतो. गजकर्णांंची डोक्यात कानामागे, केसांमध्ये, नखावर, मानेवर, काखेमध्ये छाती व पोटाच्या वळ्यांमध्ये, जांघेत, मांड्यांच्या आतल्या बाजूवर लागण होऊ शकते. घाम येणार्‍या भागामध्ये याची जोमाने वाढ होते.

गजकर्णाची त्वचेवर लागण झाली की, ती त्वचेच्या, केसांच्या मुळाशी पोहोचते. केस निस्तेज होऊन मुळासकट गळतात. डोक्यात चाई (टक्कल) पडते. गजकर्ण झालेली जागा गालि वा लांबटगोल दिसते. गुलाबी लालसर असते. गजकर्णाची जागा सुजलेली असून खरखरीत मध्यभागी स्वच्छ दिसते. ही जागा असह्य खाजेमुळे नखांनी खाजवली जाते व नखांमार्फत इतर निरोगी त्वचेला त्याची लागण होते. रक्तामार्फतही प्रसार होतो. आजाराच्या सुरुवातीलाच योग्य ती दक्षता घेतली नाही तर आजार मूळ धरतो आणि त्यावर मात करणे कठीण होते. एकमेकांच्या सान्निध्याने हा रोग पसरतो. गजकर्ण झालेल्या व्यक्तीचा टॉवेल, कंगवा, कडपे, साबण अशा वस्तू वापरल्यानेही या रोगाचा प्रसार होतो. मधुमेह असणार्‍या व्यक्तींना एकदा का या विकाराची लागण झाली तर हा रोग लवकर हटत नाही. अशा व्यक्तींची नखं हमखास किडत राहतात.

उपचार
निसर्गोपचार
आजाराच्या सुरुवातीला नैसर्गिक उपचारांनी क्वचित रोग आटोक्यात राहू शकतात. जरी पूर्ण बरे झाले नाहीत तरीही प्रसार होत नाही.
पपई : गजकर्णाच्या चट्ट्यावर कच्च्या पपईच्या फोडी घासाव्यात किंवा पपईच्या बिया वाळवून त्यांची पूड पाण्यात कालवून ती चट्ट्यांवर लावावी.
मोहरी : गजकर्ण झालेली जागा गरम पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यात वाटलेली मोहरी लेप करुन लावावी.
तमालपत्र : गजकर्णामध्ये खाज व होणारा दाह थांबवण्यासाठी तमालपत्राच्या पानाचा लेप लावल्याने खाजणे कमी होते.
तुळस : त्वचाविकारांवर तुळशीच्या पानांचा लेप लावल्यास दाह कमी होतो.
हळद : ओल्या हळदीचा रस काढावा व तो चट्ट्यांवर लावावा. एक चमचा हळदीचा रस व तेवढाच मध मिसळून सकाळी अनशेपोटी घ्यावा.
होमिओपॅथी : या त्वचाविकारावर संयुक्त उपचार म्हणजे अ‍ॅलोपॅथी व होमिओपॅथी यांचे संयुक्त उपचार उपयोगी ठरतात. तशी एक पद्धत विकसित केली गेली आहे. नेक होमिओपॅथी औषधे या विकारात उत्कष्ट काम करतात. रोगांचे समूळ उच्चाटन करणे व प्रसार रोखणे असे उपचारांचे स्वरुप असते. केस गळून चाई झाली होती. अंगावर चट्टे उठून असह्य खाज यायची त्यासाठी बुरशीपासून पोंटेटायझेशन करुन तयार केलेली काही होमिओपॅथीक औषधे देण्यात आली. बुरशी तर नष्ट झालीच शिवाय चाई पडलेल्या ठिकाणी नवीन केसही येऊ लागले आहेत.
औषधे :
सेपिया, फोगापायरम, बोव्हिस्टा, कालीमुर, डलकमरा
इतर उपाय : स्वच्छता राखणे हा त्वचाविकारांमध्ये मूलमंत्र आहे. मोकळ्या हवेत फिरावे, भरपूर पाणी प्यावे. दिवसातून दोनवेळा आंघोळ करावी. आंघोळ करताना चट्टे सोडून उरलेल्या अंगावर तळव्यांनी मसाज करावा. चट्ट्यावर चांगले खोबरेल तेल लावावे. दिवसातून एकदा चट्ट्यांवर मुलतानी मातीचा लेप लावावा. रुग्णाचे कपडे, साबण, टॉवेल, कंगवा वेगळा असावा. सात्विक आहार घ्यावा. पोटात घेण्याची औषधे वेळेवर घ्यावीत.

Dr sonali sarnobat

 

संपर्क डॉ सोनाली सरनोबत

केदार क्लिनिक -0831-2431362
सरनोबत क्लिनिक 0831-2431364

 belgaum

2 COMMENTS

  1. मला पाच सहा महिन्यापासून गचकरण आहे जास्त होत चालले आहे त्याच्यावर उपाय काहीतरी सांगा हॉस्पिटलमध्ये येऊन मी भेटू शकतो माय व्हाट्सअप नंबर ला 830 8119993 प्लीज मला कॉल करू शकता मला गचकरना मधून मुक्ती पाहिजे प्लीज प्लीज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.