गतिमंद मुलांमध्ये काही सुप्त कलागुण असतात. त्यामुळे त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अंकुर शाळेतील संचालक व इतरांनी चांगलेच प्रयत्न केले आहेत. त्याचेच प्रयत्न म्हणून अंकुर शाळेतील मुलांना चांगले प्रशिक्षित करण्यात आले आहे.
शिक्षणा बरोबरच त्यांना विविध कलागुणांना व देण्यात येत असल्याने त्यांच्या कल्पकतेत वाढ होत आहे. याच मुलांनी चक्क राख्या बनवल्या असून त्या राख्यांची मागणी वाढत आहे.
गतिमंद मुलांनी तयार केल्या गेलेल्या राख्यांच्या मागणीत वाढ होत असून या राख्या आता बेंगलोर आणि मुंबईतील बाजारपेठेत पोहोचल्या आहेत त्यामुळे इतर ठिकाणाहून राख्या मागविण्यापेक्षा आता बेळगावतील बाजार पेठेही या राख्या ठेवाव्यात असे सांगण्यात येत आहे.अंकुर शाळेची ही मुले दर वर्षी राख्या बनवितात. त्यामुळे यावर्षीही त्यांना राख्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य देण्यात आले आहे. याचा विचार व त्यांना याबाबत शाळेतर्फे योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. यंदाही या मुलांनी राख्या बनविण्यात आल्या आहेत अशी माहिती अंकुर शाळेच्या गायत्री गावडे यांनी दिली.
या मुलांच्या कल्पकतेतून बनविण्यात येणाऱ्या राख्या या अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यात त्यांना हा व्यवसाय स्वयंरोजगार मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी खचून न जाता त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत या शाळेच्या संचालक मंडळींनी केले आहे.