भारत रत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे.
कर्नाटक राज्य सरकारने देखील उद्या शुक्रवारी दि 17 आगष्ट रोजी शासकीय सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळं शुक्रवारी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेज आणि सरकारी कार्यालये बंद असणार आहेत.
मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी देखील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना सात दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला असून 17 आगष्ट ते 22 आगष्ट पर्यंत सर्व शासकीय कार्यालावरील राष्ट्रध्वज अर्ध वट फडकवले जाणार आहेत.