आधुनिक जगतात उच्च रक्तदाब ह्या आजाराचा खूपच झपाट्याने प्रसार होऊ लागला आहे. या आजाराला छुपा मारेकरी असेही संबोधले जाते. रक्तदाब हे हृदयाचे आकुंचन व प्रसरण होण्याच्या स्थितीचे निदर्शक आहे. वाढते औद्योगीकरण, लठ्ठपणा, अयोग्य आहार, मानसिक ताणतणाव या कारणांनी उच्च रक्तदाबाच्या रूग्णांची संख्या वाढतच आहे. रक्तदाब स्फिग्मोमॅनोमिटर या उपकरणाने मोजतात. आता डिजिटल क्रांती झाल्यामुळे पूर्ण तः स्वयंचलित उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे अगदी अचूक रक्तदाब मोजणे शक्य असते. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला पोहोचणार्या जास्त रक्तदाबाला सिस्टॉलिक प्रेशर म्हणतात. व दोन ठोक्यामधील सर्वात कमी दाबाला डायस्टॉलिक दाब म्हणतात. तरूणपणात 120/80 एवढा सरासरी रक्तदाब असतो. वृध्दापकाळात सरासरी 160/90 असा रक्तदाब आढळून येतो.
कारणे- चुकीच्या जीवनशैलीमुळ, मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. आजकाल आय. टी किंवा बी. पी. ओ सारख्या क्षेत्रात पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी राव्ीचा दिवस करून काम करायचे, खासगी आयुष्यावर मर्यादा खाण्याच्या वेहांचे बंधन नाही, शरीराला व्यायाम नाही वारेमाप मिळणारा पैसा आणि त्यांच्या धुंदीत चाललेली चैन यामुळे तर अक्षरशः शरीराचे आणि मनाचेही मातेर होते. धुम्रपान, चहा, कॉफी इ. पेयांचा अतिरेक, प्रक्रियायुक्त अन्नाचे सेवन, मांसाहार, मद्यपान इ. कारणांनी आयुष्याच्या नैसर्गिक तोल बिघडतो. शरीरात अनेक त्याज्य व विषारी पदार्थ तयार होतात. रक्तवाहिन्याचीं आवरणे कठीण होतात. त्यामुळे त्यांचा व्यास कमी होऊन रक्तप्रवाहात अडथळा येऊन जास्त दाब निर्माण होतो. मधुमेहामुळेही रक्तदाब वाढतो. मूत्रपिंडांच्या विकारामुळेही उच्च रक्तदाब होऊ शकतो. तेल, चरबीयुकय्त पदार्थ, मीठ यांचे प्रमाणा आहारात जास्त असल्यास रक्तदाब वाढतो. तंतुमय पदार्थांची कमतरता उच्च रक्तदाबासाठी पोषक ठरते.
लक्षणे- डोक्याच्या मागच्या बाजूस व मानेत वेदना येताता किंवा जडपणा जाणवतो. या वेदना आल्यासारख्या नाहीशाही होतात. भोवळ येणे, धडधडणे छातीत दुखणे, सारखे लघवीला होणे मानसिक दडपण, थकवा श्वासाला त्रास होणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. पायावर घोट्याकडे सूज येणे क्वचित चेहरा सुजणे अशीही लक्षणे आढळून येतात.
उपचार
आहार उपचार- मांसाहार व अंडी खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते. फळै व शाहाहारामुळे शरीरातील मेद कमी होऊन रक्तवाहिन्या लवचिक होऊन रक्ताभिसरण सुधारते. पोटॅशियम व कॅल्शियमयुक्त (दूध, फळे, फळभाज्या) आहारामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.
लसूण- दररोज दोन पाकळ्या खाल्ल्याने फायदा होतो.
आवळा, लिंबु- क जीवनसत्वामुळे सूक्ष्म रक्तवाहिन्यामधील अडथळे दूर होऊन रक्ताविभसरण सुधारते.
कलिंगड- कलिंगडाच्या बिया वाळवून व भाजून खाव्यात. यातील घटक रक्तवाहिन्या रूंद करण्यास मदत करतात.
संपर्क डॉ सोनाली सरनोबत
सरनोबत क्लिनिक -0831-2431364
केदार क्लिनिक-0831-2431362