शहर परिसरात भुरट्या चोऱ्या,घरफोडी आणि मंदिरात चोरी होत असलेल्या घटना वाढत असताना पोलिसांनी गस्त वाढवली असून सलग दोन दिवसात घरफोडी लुटीचा प्रयत्न करणाऱ्या दोन टोळ्यांना गजाआड केलं आहे.शहापूर पोलिसांनी दरोड्याचा तयारीत असलेल्या पाच जणांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच खडेबाजार पोलिसांना दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या आणखी एका टोळीला मध्यरात्री साडेबारा वाजता जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे.
खडे बाजार पोलिसांनी अटक केलेल्यांची संशयितांची नावं खालील प्रमाणे आहेत गणेश भीमा हाजगोळकर (वय 20, रा. बुरुड गल्ली), राकेश रमेश क्षीरसागर (वय 19, रा. रेल्वे कॉर्ट्सर), राजेश मारुती सावंत (वय 28, रा. कामत गल्ली), सादिक अत्तरहुसेन तडकोड (वय 28, रा. न्यू गांधीनगर), शिवराज जयवंत मोहिते (वय 24, रा. केरकळबाग) अशी आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून त्यांच्याकडून धाड टाकून कोयता, लोखंडी रॉड, प्लास्टिक दोरी, मिरचीपूड जप्त केली आहे. सरदार्स हायस्कूल मैदानावरील स्टेडियम नजीक काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत बसले आहेत, अशी माहिती खडेबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यू. एच. सातेंनहळळी यांना मिळाली होती. त्यांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याठिकाणी धाड टाकून वरील पाच जणांना अटक केली.ओल्ड पुणे बंगळुरू रोडवरील बल्लारी नाल्यानजीक दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केल्यानंतर पुन्हा आणखी एका टोळीला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.एकूणच गेल्या काही दिवसात शहर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे.