Sunday, November 17, 2024

/

‘कर्नाटकात आहे राष्ट्र ध्वज बनवण्याचं एकमेव केंद्र’

 belgaum

डौलाने फडकणारा  तिरंगा ध्वज पाहिला की सर्वांच्या मनात उत्साह आणि देश भक्ती  संचारते.  मात्र हा  ध्वज  बनतो कुठे याची माहिती जास्त  कुणाला नसते , तर राष्ट्रध्वज  तयार होतो  कर्नाटकातील  हुबळी  जिल्ह्यातील बेन्गेरी  येथील  खादी ग्रामोध्योग संघात….   हे  देशातील  अधिकृत असे  एकमात्र  राष्ट्र ध्वज  बनविण्याचे  केंद्र आहे   .तिरंगा  ध्वज  बनविण्याच्या या  केंद्रा विषयी  जाणून  घेऊयात   बेळगाव live च्या माध्यमातून.

हुबळी मधील  बेन्गेरी इथल्या कर्नाटक खादी  ग्रामोद्योग संयुक्त संघ फेडरेशन मध्ये  राष्ट्र  ध्वज   निर्मितीचे देशातील एकमेव  केंद्र आहे . २००६ साली या  ध्वज  निर्मिती  केंद्रास  भारत सरकारने ध्वज तयार  करण्याची( b s i..  berou of indian standards)परवानगी दिली. मान्यता प्राप्त असे  देशातील एकमेव  केंद्र आहे.  इथूनच बनलेले ध्वज   संपूर्ण देशात नव्हे तर जगभरातही जिथे  इंडियन ऐम्ब्यासी  आहेत तिथे सुद्धा पाठविले जातात . राष्ट्रध्वजा  व्यतिरिक्त कर्नाटक आणि गोवा राज्याचे पोलिस ध्वज सुधा  इथेच बनविले जातात . एकूण  २५ महिला मिळून एकूण ४५ कर्मचारी इथे ध्वज बनविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात.

flag_making factory

या ध्वज निर्मितीच्या संघाची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपये इतकी आहे.  १९५७ साली या खादी  ग्रामोध्योगाची स्थापना झाली होती या अगोदर इथे प्रायोगिक तत्वावर ध्वज बनवले जात होते मात्र २०० ६ पासून हे ध्वज  बनविण्याचे देशातील एकमेव अधिकृत केंद्र बनले आहे  २०० ५ मध्ये  याची वार्षिक उलाढाल २३ लाख , २००६ मध्ये  ४६ लाख , २००७ मध्ये ५३ लाख ,२००८ मध्ये ८३ लाख २००९ एक कोटी २५ लाख तर या वर्षी २ कोटी उलाढाल झाली आहे . अशी माहिती सचिव खादी  ग्रामोध्योग संघ हुबळी ए  एस  अंतेन यांनी दिलीय.

एकदा ध्वज तयार होईपर्यंत १८ वेळा परीक्षण केले जाते आणि नंतर हा ध्वज तयार केला जातो . बागलकोट येथे याच  संघाचे खास कापड तयार करण्याचे  ३ युनिट असून इथे विशिष्ठ प्रकारचे कापड तयार करण्यात येते एक चौरस सेंटी मीटर कपड्यात  १५० सूत पाहिजेत या साठी  लागणारे सुत फक्त धारवाड जवळील गरग आणि बागलकोट इथेच मिळते हे सगळे या उत्पादनाचे रहस्य आहे. ध्वज  निर्मितीत लागणारे  कापड जीन्स पेक्षाही दीड पट जाड असते या शिवाय खास प्रकारची दोरी आणि वुडन टग चा वापर करण्यात येतो .

हुबळी येथील खादी ग्रामोध्योग संघात  ९ वेगवेगळ्या प्रकारचे ध्वज बनविले जातात  त्यांचा  बनविण्याचा रेशो १ : १ ,१ /२  असा असतो  वेगवेगळ्या प्रकारचे  ध्वज कुठे  वापरावे याचा आकार  देखील  ठरलेला असतो , राष्ट्रीय ध्वज कोड  नियम  बनविलेले आहेत ते जाणून  घेऊयात

१४ गुनुले १२  या आकाराचा सर्वात  मोठा ध्वज   ग्वाल्हेर चा  किल्ला ,कोल्हापूर आणि रायगड चा किल्ला तर कर्नाटकातील नरगुंद चा किल्ला इथे फडकाविला   जातो

८ गुनुले १२ या आकाराचा  ध्वज ,   संसद भवन, सर्व राज्याची विधान भवन ,लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन मध्ये फडकाविला जातो .

६ गुनुले ९ मिलिटरी कमांडो  कार्यालयावर फडकाविला जातो

४ गुनुले ६ चा ध्वज जिलाधिकारी आणि पोलिस आयुक्त कार्यालयावर तर

३ गुनुले ४ १ /२ चा ध्वज आणि २ गुनुले ३ चा ध्वज ,  शाळा सोसायटी बस स्थानक ऑटो स्थानक ,जिल्हा परिषद तालुका परिषद  सर्व प्रकारच्या केंद्रीय आणि राज्य सरकारच्या कार्यालयावर फडकाविला जातो जर १५ ते  २० फुटांचा पोल असेल तर २ गुनुले  ३ आणि २० ते २५ फुटांचा पोल असेल तर ३ गुनुले ४ १ /२ चा ध्वज फडकाविला जातो .

१२ इंच गुनुले १८ इंच याला एअर फ्लॅग म्हणतात राष्ट्रपतीच्या गाडीच्या उजव्या बाजूला भारतीय ध्वज समोर असतो

६ इंच गुनुले ९ इंच याला कर फ्लॅग म्हणतात तो व्ही व्ही आय पीच्या वाहनांवर असतो

४ इंच गुनूले ६ इंच याला टेबल फ्लॅग म्हणतात हा देशात कुणाच्याहि टेबल वर असू शकतो मात्र त्यासाठी एक आत अशी आहे कि या ध्वजाच्या वर कोणत्याही जाती धर्माचा ध्वज असू नये

२ इंच गुनुले ३ इंच याला पाकीट  फ्लॅग म्हणतात प्लास्टिक चे  ध्वज टाळण्यासाठी याचा वापर करतात  आता पर्यंत  देशात सगळे काही बदलले  आहे मात्र राष्ट्र ध्वज संहिता कायदा  मात्र  जश्यास तसाच आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.