राज्यात सर्वात मोठा जिल्हा असलेल्या सर्वात मोठ्या जिल्हा पंचायतीची स्थायी समिती निवडणूक बिन विरोध पार पडली.येळ्ळूर जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांची आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
इतर अध्यक्षा पैकी बैलहोंगल दोडवाडचे शंकर मुडलगी यांची कृषी आणि औद्योगिक, सामाजिक न्याय स्थायी समिती अध्यक्ष पदी शैलजा कागे यांची निवड करण्यात आली आहे. तर सामान्य स्थायी समिती अध्यक्ष पद उपाध्यक्ष अरुण कटांबळे तर अर्थ लेखा आणि योजना स्थायी समिती अध्यक्ष पद हे अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्याकडे असते.
भाजपच्या दहा सदस्यांची,तर जे डी एस एक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोघांची वर्णी सदस्य पदी करण्यात आली. एकीकरण समितीचे खानापूर चे नारायण कारवेकर यांची सामान्य स्थायी समिती तर हिंडलगा जिल्हा पंचायत सदस्या माधुरी हेगडे यांची अर्थ लेखा योजना सथायी समितीत सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पिरनवाडी जिल्हा पंचायत सदस्या शांता जैनोजी यांची भाजप कोट्यातून कृषी स्थायी समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नव नियुक्त अध्यक्ष आणि सदस्य स्थायी समिती अध्यक्षांना जिल्हा पालक मंत्री रमेश जारकोहोळी यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा पंचायत सी इ ओ रामचंद्र राव,आमदार गणेश हुक्केरी,विवेक राव पाटील आदी उपस्थित होते.
मराठी कडेच मोठं पद
मागील वीस महिन्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण हे स्थायी समितीच अध्यक्ष पद मोहन मोरे या मराठीचेहऱ्या कडे होत आता पुढील वीस महिने देखील हे पद रमेश गोरल यांच्या रूपाने मराठी भाषिकांलाच मिळालं आहे.