बेळगांवच्या युवकांत ‘मृत्यूचे भय संपलेय’ का?

0
 belgaum

दर रविवारी आंबोली मध्ये पर्यटकांचा अक्षरशः महापूर लोटतो. त्यात हौसे, नवसे, गवसेंचा मोठ्या प्रमाणावर भरणा असतो. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवणारे अनेक जण असतात. त्यामुळे त्यांना हे करण्यापासून रोखायच तर कुणी असा प्रश्न आहे.
बेळगाव भागातील पर्यटकांचेच का अपघात होत आहेत हा संशोधनाचा विषय ठरला आहे.तिलारी अपघातात ह्याच महिन्यात पाच , गुरूवारी एका विद्यार्थीनीचा बुडून मृत्यू, मागील महिन्यात खानापूर रोड वर पर्यटनाला जाणारे तिघे चिमुरडे युवक दुचाकी अपघातात दगावले होतें आज आंबोलीत परत अपघातात एका बेळगावकराचा मृत्यू …. मग नेमकं काय सुरू आहे ? इतक्या गर्दीमध्ये पर्यटन गरजेच आहे का ? असा विषय पुढे येतोय. त्यात फिल्मी स्टाईल गाड्या चालवून दुसऱ्याच लक्ष वेधण्याच्या नादात आपल आयुष्य अनेकजण गमावून बसताहेत. मग ह्यांना नव्याने जीवनाची व्याख्या सांगण्याची गरज निर्माण झाली आहे का ? असे असंख्य प्रश्न यानिमित्तानं समोर येत आहेत.

Amboli

bg

गेले दोन महिने बेळगावातील युवक दर रविवारच पर्यटन म्हणून फिरायला जातात अन अपघातात मरतात या कामी खेडे गावात राहणाऱ्या विद्यार्थीनी मागे नाहीत त्यामुळं पुन्हा एकदा बेळगाव साठी 21 जुलैचा रविवार हा चौथा ब्लॅक संडे ठरला आहे.या सगळ्या घटना पहिल्या असता पालकांचा मुलांवर कन्ट्रोल राहिलेला नाही किंवा आजच्या युगातला टी व्ही मिडिया सेल्फी मोबाईल मोटार सायकल आणि नशा ,मौज मजा याच्या आहारी गेलेला युवक अशी प्रमुख कारणे देता येतील.या चारी घटनांत मयत झालेले हे युवकच आहेत त्यांच वय तिशीच्या आतलंच आहे.पर्यटनाच्या नावाखाली मौज मजा करणारे बेळगावात जेवढं साध्या पद्धतीनं राहतात वागतात, ते बेळगाव बाहेर गेल्यावर असे आऊट ऑफ कंट्रोल बेफाम का होतात यावर कुठं तरी लक्ष द्यायला हवं.

पर्यटन म्हणजे निसर्ग अनुभवणे या गोष्टीला काहीच महत्व राहिलेलं नाही पर्यटन म्हणजे केवळ नशा करणे ते दारूचा असो,गुटखा असो किंवा इतर कुठला तरी असो ही …निसर्ग पर्यटनची व्याख्या बदलायला हवी त्यामुळं पालक असोत किंवा युवक किंवा शिक्षक प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

टीप:वाचकांच्या या विषयावर प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.