आंबोली गेळे फाटा जवळ महिंद्रा झायलो आणि करिज्मा दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकी वाल्याचा एकाचा मृत्यु झाला तर सोबत असलेला एक जखमी झाला.ही घटना आज संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
वर्षा पर्यटनाला रविवार ची सुट्टी असल्याने येथे कर्नाटक बेळगाव हुन हीरो करीज्मा दुचाकी के ए २२ ई एल ५६३३ याने भारत पद्मनेश हांजी (वय २६) रा.अनगोळ ,बेळगाव (कर्नाटक) व बसलिंग धनाचार्य (वय २८) रा.बेळगाव (कर्नाटक) आंबोली च्या दिशेने येत होते तर आंबोली हुन कोल्हापुर दिशेला जाणारे महिंद्रा झायलो एम एच २४ ए एफ ३५७३ ने चालक दत्तात्रेय सुभाष जांभदाळे रा. लातूर (महाराष्ट्र) चालले असता.येथील गेळे फाटा जवल झायलो या चारचाकीने दुचाकिला धडक दिल्याने दुचाकी स्वार भारत हांजी व बसलिंग धनाचार्य जखमी झाले.त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला कळवल्यावर आंबोली येथील १०८ क्र. रुग्णवाहिका डॉ.अभीजीत मोराळे घेऊन पोहचले.आज रविवार असल्याने आंबोली पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची गर्दी होती.त्यामुळे मधे मधे वाहतूक कोंडी असल्याने. जखमींना आजरा येथे नेण्यात आले. मात्र या अपघातात भारत हांजी या तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा अपघाता नंतर काही वेळातच मृत्यु झाला.यानंतर आंबोली पोलीसांना घटनेची माहिती मिळताच घटने स्थळी पोलीस ना. हवालदार, विश्वास सावंत, राजेश गवस यांनी पंचनामा केला.तसेच रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याच्या हालचाली सुरु होत्या.