डायबेटीस मेलायटीस हा ग्रीक भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ आहे सायफन म्हणजे शोधून काढणे आणि मेलायटीस म्हणजे हनी अर्थात मध म्हणजे साखर. डायबेटीस मेलायटीस म्हणजे शरीरातील साखर रक्तातून ती लघवीवाटे बाहेर पडणे. हा रोग काही नवा नाही. अगदी पुरातन काळापासून तेव्हाच्या वैद्य व शास्त्रज्ञांना याची माहिती होती. मधुमेहाचे प्रमाण मात्र अलीकउे अतिशयच वाढले आहे. माणसाची चंगळवादी वृत्तीच त्याला कारणीभूत ठरत आहे. साखरेच खाणार त्याला देव देणार अशी म्हण बदलून आता साखरेच खाणार त्याला देव लवकर नेणार असे म्हणायची वेळ आलीली आहे. डयबेटीसचे ढोबळमानाने दोन प्रकार केले जातात.
1. इन्सुलीन डिपेंडंट डायबेटीस मेलायटीस.
2. नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मेलायटीस
खऊऊच या विकारामध्ये स्वादुपिंडामधील आलेटस ऑफ लंगरहॅन्स नावाच्या पेशीसमूहामधील बीटापेशी नैसर्गिक इन्सुलिन जे साखरेचे पचन करते ते तयार करू शकत नाहीत. काहीवेळा शरीराच्या संरक्षक पेशी स्वतःच्याच चांगल्या पेशीविरूध्द बंड पुकारतातमग असहकार होऊन इन्सुलिन निर्मिती बंद होते व पेशींचा र्हास होत जातो. हा विकार तरूण वयातच आढळतो. अगदी तान्ह्या बाळापासून ते 35- 39 वयापर्यंत. यावर इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याशिवाय पर्याय नाही.
छखऊऊच या प्रकारामध्ये एक तर बीटापेशी व्यवस्थित कार्य करत नाहीत व इन्सुलिन निर्मिती कमी होते किंवा शरीरातील इतर पेशींकडून इन्सुलिनच्या कामाला अडथळा निर्माण केला जातो. त्यामुळे साखरेचे पचन होऊ शकत नाही. त्यामुळे अतिरिक्त साखर रक्तात व रक्तातून लघवीत उतरते. या विकारावर इन्सुलिन इंजेक्शन क्वचितच द्यावी लागतात. इतरवेळी गोळ्या औषधांवर साखर नियंत्रित होते. हा विकार चाळीशीनंतर सुरू होतो.
मधुमेह झाला आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी रूग्णाची अनशेपोटी रक्तर्शरेची पातळी मोजली जाते.ती 80 ते 120 मि. ग्रॅ पर्सेंट असावी लागते व जेवणानंतर दोन तासांनी हीच पातळी 80 ते 160 मि. ग्रॅ पर्सेंटपर्यंत जाते. या पातळीपेक्षा जास्त साखर आढळल्यास मधुमेह झाला आहे असे समजावे.
कारणे
1. जनुदोषांमुळे खऊऊच या प्रकारचा मधुमेह होऊ शकतो.
2. अनुवेशिकता
3. लठ्ठपणा
4. अनियंत्रित आहार
5. चुकीचे राहणीमान
6. चिंता, काळजी, अतिदुःख व अतिरिक्त मानसिक ताण
7. औषधांच्या (स्टिरॉईड्स, इतर रसायने) सदोष वापरामुळे
8. गरोदरपणामध्ये
9. कुपोषण इ. मुळे छखऊऊच हा मधुमेह होऊ शकतो.
वाढत्या जागतिकीकरणामुळे, बदलत्या जीवनपध्दतीमुळे, बैठे काम, चमचमीत खाणे, तेलाचा अतिवापर, व्यायामाचा अभाव, शारीरिक दगदग, मानसिक तणाव यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढतच चालले आहे. येत्या दहा वर्षात भारतात 90 टक्के लोक मधुमेहाची शिकार होतील असा निष्कर्ष एका अभ्यासगटाच्यापाहणीनुसार निघाला आहे. अनियंत्रित खाणे आणि लठ्ठपणा या दोन कारणांनी मधुमेह होतोच. शिवाय जास्त साखर, कार्बोहायड्रेटस व अतिस्निग्ध आहार, मांसाहार घेतल्यानेही अतिरिक्त साखर निर्माण होऊन तिचे पचन होणे कठीण होते.
लक्षणे- मधुमेही रूग्णांना सारखी तहान व भूक लागते. सतत लघवी होते. शारीरिक व मानसिक थकवा लवकर येतो. त्वचा फिकट व निस्तेज दिसते. पोट साफ होत नाही. लघवीच्या जागी खाज येते. नाडीचे ठोके जलद होतात. जुनाट मधुमेहाच्या रूग्णाचे वजन कमी होत राहते. त्वचा राकट बनते केस गळतात, हातापायांना मुंग्या येणे, सुन्न होणे अशी लक्षणे दिसतात. जखम झाल्यास लवकर वाळत नाही. दृष्टी क्षीण होते. हृदय व मूत्रपिंडाचे कार्य मंदावते, चेतवाहिन्यांवर परिणाम होऊन चेतना क्षीण होते. हातापायाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन चेतना क्षीण होते. हातापायाच्या रक्तवाहिन्या खराब होऊन रक्तपुरवठा मंदावतो. त्यामुळे लवकर थकवा येतो. अंग ठणकते. एक ना दोन
मधुमेह आणि उपचार
आपल्या आजच्या चंगळवादी राहणीमानामुळे व अयोग्य आहार पध्दतीमुळे आपण- आपले राष्ट्र हे लवकरच नंबर एकचे मधुमेही राष्ट्र बनणार आहोत. आजकाल, मधुमेही रूग्ण बरेच असल्याने बरेच गल्लाभरू वैदू व भोंदू डॉक्टरमंडळी मधुमेहाची रामबाण औषधे विकतात दिसत आहेत. परंतु मधुमेहाच्याबाबतील अॅलोपॅथी काय किंवा आयुर्वेद काय अथवा होमिओपॅथी काय कोणतीही उपचारपध्दती परिपूर्ण नाही. म्हणून जी उपचारपध्दती जेथे परिणामकारक असल्याचे सिध्द होईल तेथे ती पध्दती स्वीकारावी, मधुमेहावरील पहिल्या लेखात आपण पाहिले की डायबेटीस टाईप वन जो काही कारणास्तव इन्सुलीनचे उत्पादन बंद झाल्यामुळे होतो, त्याला इन्सुलिन इंजेकश्न घेण्यावाचून पर्याय नाही.
खऊऊच उपचार- या विकारात इन्सुलीनचे इंजेक्शनच घ्यावे लागते. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच उपाययोजना करावी. कोणत्याही काढ्याने किंवा ड्रॉप्स घेऊन असा डायबिटीस बरा काय, कंट्रोलसुध्दा होऊ शकत नाही. हा डायबेटीस बरा काय, कंट्रोलसुध्दा होऊ शकत नाही. हा डायबेटीस क्वचित जीवघेणासुध्दा ठरू शकतो. त्यामुळे रूग्णाने कायम सावध असावे. तरूण वयातच (वय 5 ते 30 वर्षे) बहुधा हा विकार होत असल्याने मनाचा कणखरपणा वाढवण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पुष्पौषधीची मदत घेतल्याने रूग्णाचा फायदा होतो.
उपचार- म्हणजे या विकारामध्ये 1. इन्सुलीनची कमतरता असते. 2. स्नायुंकडून साखर वापरली जात नाही (कामाचा व्यायामाचा अभाव) 3. यकृताकडून जास्त साखर तयार करून रक्तात सोडली जाते. या सर्व क्रियांचा ताळतेळ न बसल्याने असा मधुमेह होतो. अॅलोपॅथीमध्ये सल्फोनाइलयुरीयाज व बायगय्वानाईडस अशा औषधांतर्गत मेटफॉर्मिन अकारबोस, ग्लिबेनक्लामाईड, ग्लीपीझाईड, ग्लीक्लाझाइड अशी सर्वश्रुत औषधे ठराविक डोसामध्ये वापरली जातात. व तरीही साखर मर्यादित नसेल तर इन्सुलीनचा वापर केला जातो. नियमित व्यायाम, आहार नियंत्रण,वॉकिंग करूनसुध्दा काही रूग्णांची साखर आटोक्यात रहात नाही. त्यांनी काय करावे. अशावेळेस निसर्गोपचार व होमिओपॅथी कामास येते.
निसर्गोपचार- आहार उपचार
गवारीच्या शेंगा- पाण्यात उकळून प्यायल्याने रक्तशर्करा व अतिरिक्त चरबी आटोक्यात येते.
मेथी व मेथीदाणा : भिजवून चावून खाल्ल्यानेसुद्धा तंतुमय पदार्थामुळे रक्तशर्करा व अतिरिक्त रक्तचरब (लिपीड्स) कमी होते.
कारले : कारल्यात प्लँटइन्सुलीन नावाचा घटक असून कारल्याच्या बियांची पूड आहारात वापरावी.
जांभूळ : मधुमेहावर जांभूळ फळ व बी दोन्ही गुणकारी आहे. जांभळाच्या बिया वाळवून पूड करुन वापरावी.
आवळा : आवळ्याच्या रसामुळे स्वादूपिंडामधील बीटापेशातून इन्सुलीन स्रवण्यात मदत होते.
होमिओपॅथी
विविध औषधांच्या अर्कावर शक्तीकरण प्रयोग करुन सिद्ध केलेले ड्रॉप्स होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे कधीही आटोक्यात न राहणारी साखर आटोक्यात येते. रुग्णाला आलेली उदासिनता, स्थुलता, कार्यक्षमतेचा अभाव या गोष्टी जाऊन पुन्हा नव्याने उत्साह मिळतो. होमिओपॅथी हे शास्त्र जरी भारतीयांना नवीन नसले तरी याचा सर्वांगीण विकास जर्मनीत झालेला आहेश. तेथील उत्कृष्ट उत्पादन व निर्मितीमुळे तेथे तयार झालेली औषधे सर्वोत्कृष्ट मानली जातात. एकाच प्रकारचे औषध एकाच रुग्णाला सातत्याने देता येत नाही. काही डॉक्टर्स पेशंटची हिस्टरीसुद्धा न घेता सर्वांना एकाच प्रकारचे औषध देतात. तसे केल्याने तात्पुरताच फायदा होऊन पुन:श्च मधुमेहाचा अक्राळविक्राळ राक्षस रुग्णाला ग्रासतो. प्रत्येक रुग्णाच्या व्यक्तीवैशिष्ठ्याुसार होमिओपॅथीक औषधे द्यावी लागतात.
मधुमेहींचा आहार-विहार
सर्व आरोग्या आपत्तीचा विचार व संशोधन केल्यावर असे आढळले की या विकाराच्या अनेक कारणांपैकी सदोष आहारपद्धत हे एक मुख्य कारण आहे. सर्वच क्षेत्रात प्रगती होता होता औद्योगिकीकरणाने सुबत्ता येत गेली व त्याचबरोबर खाण्यापिण्यात अतिरेक, चंगळवाद, जंकफूड, फास्टफूड यासारखे कल्चर बोकाळत गेले. परिणामस्वरुप मधुमेहासारख्या दुर्धर व्याधीचा प्रादुर्भाव वाढू लागला. हे आजार समाजाच्या एकंदर प्रगतीवर वाईट परिणाम करतात. म्हणूनच आज प्रत्येकाने आपल्या आरोग्याबद्दल जागरुक राहणे आवश्यक आहे.
मधुमेहाचे आवश्यक असणार्या आहार संकल्पनेबाबत काही प्रमुख समज-गैरसमजांचे निराकारण होणे आवश्यक आहे.
उपवास : काहीजण न खाता उपवास केल्याने साखर कमी होते व मधूमेह नियंत्रणात येतो असे समजतात. परंतु यामुळे शरीरातील चरबी जळून ऊर्जा उत्पन्न करण्याच्या प्रक्रियेत किटोन बॉडीज हे घातक घटक रक्तात तयार होऊन त्याचा हृदयावर अनिष्ट परिणाम होतो. रक्तातील साखर कमी झाल्याने भोवळ येऊ शकते. उपवासासाठी भरपूर बटाटे, साबुदाणा, रताळी, शेंगदाणे, तेल, तूप, खोबरे वापरल्यामुळे भरपूर उष्मांक (कॅलरीज) मिळून साखर वाढते.
गोडपदार्थ : मिठाई व गोड पदार्थ यामधून साखर, गूळ, काकवी, मध यापासून साखर वाढतेच. कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ सातत्याने वापरणेसुद्धा घातक असते. फळांचे रस घेण्यापेक्षा फळे चावून चोथ्यासकट खावीत. पपई, सफरचंद, ही फळे मधुमेहींना चालतात.
भात व बटाटा : भातावर निर्बध घालताना मूळ पोषणाला बाधा येत नाही ना हे पहावे. पूर्ण शिजवलेला वाटीभर भात खाण्यास आक्षेप नसावा. परंतु बिर्याणी पुला, असे तेल तुपाचे भात प्रकार खाऊ नयेत. बटाटा शिजवून थोड्या प्रमाणात चालतो. परंतु तळून (चिप्स, वेफर्स) खाऊ नये. भात व बटाटा, पालेभाज्या अन्य भाज्यांच्या बरोबर खावेत, जेणेकरुन भाज्यांमधून चोथ्यामुळे त्यातील (भात व बटाटा) कर्बोदके शरीरात भिनणार नाहीत.
जेवणाव्यतिरिक्त खाद्यपदार्थ : बहुतांशी रुग्णांना 4 घास कमी खायाचा सल्ला दिला जातो. पण मग मध्यम वेळेत अल्पोपहाराची वेळ आल्यास बिस्किटे, पाव, शेव, फरसाण, गाठी, वडे, भजी, सामोसे, पॅटिस इ. पदार्थ खाण्यात येतात. त्यामुळे प्रचंड कॅलरीज जाऊन मुख्य जेवणात केलेली घटक निरर्थक ठरुन रक्तशर्करा वाढते. त्याऐवजी लाह्या (दुधाबरोबर किंवा चिवडा करुन), भाज्या (सँडविच स्वरुपात), फळे (लाह्या व दुधाबरोबर), ब्राऊन ब्रेड, कोंड्याची बिस्किटे अशा पदार्थांचा समावेश करावा. दूधसुद्धा साय विरहित असावे.
कडू पदार्थ : कारले व मेथी तसेच कडवे वाल रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी उपयुक्त असलेतरी कडू खातो म्हणून औषधे कशाला घ्यायची हा विचार पूर्णत: चुकीचा आहे. ही केवळ सहाय्यक गोष्ट आहे.
स्निग्ध पदार्थ : स्निग्ध पदार्थामध्ये मेदयुक्त व प्रथिनयुक्त असा प्रकार आहे. काही मतप्रणालीनुसार कर्बोदके (कार्बोहाड्रेटस) कमी ठेऊन प्रथिनयुक्त पदार्थांनी उष्माकांची पूर्ती करावी असा विचार मांडला जातो. मेदयुक्त पदार्थांमध्ये तेल, तूप, वनस्पती तेल यांचा समावेश होतो. यातही संपृक्त मेदाम्ले म्हणजे डालडा, प्राणीजन्य चरबी व अंतरावयव यांचा वापर अधिक झाल्यास शरीरात ट्रायग्लिसराईडस हा मेदप्रकार वाढतो. यामुळे इन्सुलीनच्या कार्यात अडथळा येऊन रक्तशर्करा वाढते।. म्हणून मांसाहार कमी असावा. तेल व तूप हे आहारात संयोगरित्या वापरावे. कणकेत मोहन म्हणून, आमटी भाजीला फोडणी म्हणून पोळीभातावर वरुन घेण्यास, भाजीवर थोडेसेच खोबरे व दाण्याचे कूट ज्यामधून अप्रत्यक्ष तेलच जेवणात येते, असे वापरावे.
योग व व्यायाम : सर्वात स्वस्त कायम जमणारा व्यायाम प्रकार म्हणजे दररोज पाच ते सात कि.मी. भरभर चालणे, त्याला वॉर्मअप, योगासनांची जोड दनयावी. मनाच्या सक्षमतेसाठी प्राणायाम, ध्यानधारणा करावी. आपला व्यवसाय, नोकरी नैतिकतेने करावी. मनावर, शरीरावर व्यवसायाचे दुष्परिणाम होऊ देऊ नयेत. तरच संतुलन राखले जाऊन निरोगी व सुखी भारताचे स्वप्न पाहता येईल.
मधूमेहींनी घ्यावयाची काळजी
अलीकडच्या लेखांमध्ये आपण मधूमेह उपचार, आहार, पथ्य-अपथ्य याबद्दल माहिती घेतली. तसे पाहू गेल्यास हा न संपणारा विषय आहे. परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी रुग्णांना सांगाव्याच लागतात. रुग्णांना जुजबी माहिती असते परंतु या अजाराबद्दलचे व उपचाराबद्दलचे अज्ञान मधूमेह काबूत न ठेवण्यास कारणीभूत होते. त्याबद्दल आवश्यक ते ज्ञान मधुमेही रुग्णांना असणे आवश्यक असते.
मधुमेहाचा संपूर्ण शरीरावर काहीना काही परिणमा होतच असतो.
संपर्क- डॉ सोनाली सरनोबत
सरनोबत क्लिनिक -9964946818
केदार क्लिनिक-9916106896