Thursday, April 25, 2024

/

‘बसखाली सापडली तरीही ती सुदैवानं बचावली’

 belgaum

दुचाकीवरून प्रवास करणारी एक वृद्ध महिला बस खाली सापडली मात्र सुदैवानं केवळ दैव बलवत्तर म्हणून नशिबाने बचावली असल्याची घटना शुक्रवारी शहरातील कित्तुर चननममा चौकात घडली आहे. लतीफा बाळे कुंद्री वय 65 रा. बाळेकुंद्रीअसे त्या वृद्धेच नाव असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार सदर महिला भाच्याच्या दुचाकीवरून चनम्मा चौकातून संभाजी चौकाकडे जात असतेवेळी दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात सदर महिला बस खाली फेकली गेली मात्र या अपघातात ती केवळ जखमी झाली केवळ दैव बलवत्तर म्हणून ती बचावली.तिच्यावर सिव्हिल मध्ये उपचार सुरू आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक लहान मोठे अपघात होत आहेत ऐन पावसात दुचाकी स्लिप व्हायला स्मार्ट बेळगाव शहरातील रस्त्यावरील खड्डे कारणीभूत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.