डेंग्यू बी ग्रुप आबोव्हायरस नावाच्या विषाणुमुळे होणारा व एडिस जातीच्या डासांमुळे प्रसारित होणारा विकार आहे. पहिले दोन तीन दिवस फक्त डोकं, अंग दुखतं. मग सणकून ताप येण्यास सुरुवात होते. अंगदु:खी, पाठदुखी, लालभडक डोळे, डोळ्यातून पाणी येणे, भूक मंदावणे, मळमळ, उलटी, श्वास व नाडी मंदावणे, थकवा, नैराश्य अशी लक्षणे जाणवू लागतात. ताप 7-8 दिवस येत राहतो. रक्तातील प्लेटलेट कमी झाल्यावर त्वचेतून रक्तस्त्रावासारखे लाल ठिपके दिसू लागतात. नाकातून रक्तस्त्राव होणे, शौचावाटे रक्त पडणे अशी लक्षणे आढळतात. रक्त तपासणीमध्ये प्लेटलेट नावाच्या रक्त गोठवणार्या पेशींचे प्रमाण कमी झालेले तसेच इतर सफेद पेशी कमी झालेल्या आढळून येतात. ठराविक अॅटीबॉडीज वाढतात. उपचार लक्षणनुरुप केले जातात. गंभीर परिस्थितीत रुग्णाचे रक्त बदलावे लागते. (प्लाझमाफेरेसीस) क्वचीत रुग्णाचा मृत्यूही संभावतो.
चिकुनगुनीया : हा विकारही एडिस या डासापासूनच होतो. ताप, सांधेदुखी, लाल चट्टे उठून अंगावर खाज येणे असा त्रास होतो.
विषमज्वर, हिवताप (टायफॉईड व मलेरिया) : टायफॉईड व हिवताप हे देखील सूक्ष्मजंतुमुळे होणारे आजार आहेत. विषमज्वर दूषितपाणी व अन्नामुळे व हिवतापही डासांमुळेच होतो. कोणताही मुदतीचा ताप असल्यास ताबडतोब वैद्यकिय सल्ला घेणे योग्य असते. या आजारांवर अनेक उपचार उपलब्ध आहेत.
लेप्टोस्पायरोसीस : 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत अस्मानी पावसामुळे या साथीचा उद्रेक झाला होता. उंदीर, कुत्री व मांजरांच्या लघवीतून हे जंतू पावसाच्या, सांडपाण्याच्या दूषित पाण्यात मिसळतात. माणसाला पायांच्या जखमा, त्वचेवरील भेगा यांचा संबंध जर अशा दूषित पाण्याशी आला तर लेप्टोस्पायरोसीसचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बर्याच केसीसचे रिपोर्टिंगच होऊ शकत नाही. त्यामुळे जनसामान्य या माहितीपासून दूरच राहतात. शेतकरी, स्वच्छता कामगार, फिरते विक्रेते, उसाच्या फडात काम करणारे कामगार, गोठ्यात काम करणारे कामगार, डेअरीमध्ये काम करणारे, सुरक्षा सैनिक इ. ना याचा धोका जास्त असतो. मुदतीचा सणकून ताप येणे, काविळ होणे, किडनी फेल होणे, मेंदूला ताप चढणे असे होऊन जीवाला धोका संभवू शकतो. शारीरिक स्वच्छता, पावसाळ्यात गमबूट वापरणे इत्यादीमुळे प्रतिबंध करता येतो.
प्रतिबंध- सांडपाण्याचा, पावसाच्या पाण्याचा निचरा होणे खूप आवश्यक आहे. घरातील अडगळ कमी करून जंतुनाशके फवारून डासांच्या उत्पत्तीलाच अटकाव करावा. उकीरडे, प्लास्टिकचा कचरा, गटारी, डबकी यांची व्यवस्था लावणे हे महानगरपालिकेचे काम आहे. याबाबत नागरिकांनीच दक्ष राहिले पाहिजे. मच्छरदाणी वापरणे, पावसाळ्यात शक्यतो मगबूट वापरणे, रस्त्यावरचे अन्नपदार्थ टाळणे, शारीरिक स्वच्छता, घराची स्वच्छता हे साथीचे रोग टाळण्याचे मूलमंत्र आहेत. तरीही ताप आलाच तर फॅमिली डॉक्टरना दाखवून योग्य त्या रक्त लघवी तपासण्या करून घ्याव्यात.
चिकुनगुन्या : खबरदारी आवश्यक
या आजाराच्या नावात ‘चिकन’ नसून ‘चिकुन’ आहे. ‘चिकुनगुन्या’ हा आफ्रिकन भाषेतला शब्द असून त्याचा अर्थ वाकडे चालणे असा आहे. या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सर्व सांधे आखडून येणे, अंग खूप दुखणे, कंबर दुखणे हे प्रकार होतात व रुग्ण वाकडा होऊन अंग आवळून चालतो म्हणून या आजाराला या अर्थाचे नाव दिलेले आहे.
1952 मध्ये आफ्रिकेतील टांझानिया देशात या रोगाची साथ प्रथमत: दिसून आली. 1999 मध्ये हाँगकाँग, मलेशिया येथे ही साथ आली होती. सध्या 2005 पासून मॉरिशस, सेशेल्स, इंडोनेशिया येथे याचा पुन्हा उद्भव झाला व 2006 मध्ये भारतावर या साथीचे आक्रमण झाले आहे. लागण झालेल्या देशांपैकी बहुतेक सर्व विषुवृत्तीय प्रदेशामध्ये मोडतात. कदाचित सतत ऊन व सतत पाऊस असे दमट हवामान या साथीला कारणीभूत असावे.
चिकुनगुन्याचा प्रसार
‘चिकुनगुन्या’ हा आजार अल्फाव्हायरस जातीच्या एका विषाणुमुळे होतो. हा मलरिया व डेंग्युप्रमाणे डासांमार्फत पसरतो. हे डास ‘एडिस इजिप्ती’ या विशिष्ट प्रजातीचे आहेत. या डासांना त्यांच्या अंगावर पांढरे पट्टे असल्यामुळे सहज ओळखता येतात आणि महत्त्वाचे म्हणजे हे डास फक्त दिवसाच चावतात, रात्री चावत नाहीत. हे चिकुनगुन्याचे व्हायरस या डासांच्या शरीरात लागण झालेल्या रुग्णांकडून जातात व तेथेच वाढतात. असा डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
तसे पाहिल्यास फक्त डासांद्वारेच या साथीचा प्रसार होतो. परंतु या प्रसाराचा वेग पाहिल्यास हवे वाटे सुद्धा या रोगाची लागण होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
लक्षणे : विषाणुयुक्त डास माणसाला चावल्यावर साधारणत: दोन ते बारा दिवसांमध्ये हा रोग होतो. तिसर्या दिवशी या रोगाची लक्षणे दिसायला सुरुवात होते. अचानकच थंडी वाजून ताप भरतो. ही थंडी मलेरियासारखी खूप नसते. रुग्णांची कंबर व सांधे दुखतात, सुजतात इतके त्याला पलंगावरुनच काय खुर्चीवरुनही उठता, हलता येत नाही. गुडघे, घोटे, पायांची बोटे व पावले, मनगटे, हाताची बोटे, मान, खांदा, कंबर दुखायला लागतात. सांध्यावर सूज येते. ताप येऊन गेल्यावर अंगावर बारकी पुरळ येतात. खाज सुटते असे वाटावे की गोवर आला आहे.
काही रुग्णांना असे वाटते की, ही डॉक्टरी औषधामुळे आलेली रिअॅक्शन आहे. परंतु नसे नसून हे रोगाचेच एक लक्षण आहे. सांधेदुखी, ताप, अंगदुखी, पुर, फोड याबरोबरच काही रुग्णांना कानामागे, गळ्याकडे, जांघेत, छोट्या छोट्या गाठी येतात. दाबल्यावर दुखतात. काही रुग्णांना उलट्या, मळमळ, जुलाब होतात. कित्येक पेशंटना मात्र नाजूक त्वचेच्या ठिकाणी व्रणदेखील येतात.
एक गोष्ट मात्र नक्की की हा आजार जीवघेणा, घातक नाही. बरेच व्हायरल इन्फेक्शन आपोआप बरे होणारे असतात. परंतु हा रोग त्रासदायक मात्र बराच आहे.
उपचार : होमिओपॅथीमध्ये यावर खात्रीशीर इलाज व प्रतिबंधक औषध दोन्ही उपलब्ध आहेत.
प्रतिबंधक उपाय : प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. परंतु होमिओपॅथीक औषधांव्यतिरिक्त डासांच्या वाढीला प्रतिबंध करणे हाच मुख्य उपाय आहे. घराच्या आसपास सांडपाणी निचरा करणे, औषध फवारणी करणे, वैयक्तिक डास प्रतिबंध करणे हे उपाय आहेत. चिकुनगुन्याची शेकडो लोकांना लागण होत असताना सरकारी पातळीवर याची गंभीर दखल घेणे जरुरीचे आहे.
डेंग्यू
डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्चिम व पूर्व आफ्रिका, वेस्ट इंडिज, पॅसिफिक आयर्लड्स व साऊथ अमेरिका येथे याचा प्रादुर्भाव आढळून येतो. एकदा जर हा विषाणू शरीरात शिरला तर कायम शरीरात वास्तव्य राहतो.
कारणे : अस्वच्छता, पाण्याची डबकी साठून त्यावर डासांची पैदास होणे, शारिरीक स्वच्छतेचा अभाव व मच्छरदाण्यांचा वापर न करणे ही महत्त्वाची कारणे होत.
लक्षणे : काही व्यक्तींमध्ये प्रादुर्भाव झाल्यावर देखील काहीही लक्षणे आढळत नाहीत. लहान मुलांमध्ये सर्दी पडसं, जुलाब आणि खूप ताप येणे अशी लक्षणं दिसतात. व्यक्तींमध्ये मात्र अचानक खूप ताप येतो. प्रचंड डोके दुखते. सांधेदुखी, स्नायुदुखी आणि अंगावर खूप पूरळ येतात. हाडं फोडून काढणारा ताप अशी डेंग्यूची ख्याती आहे. त्यामध्ये एक खास असा प्रकार नसतो, ठराविकता नसते. नंतरच्या टप्प्यामध्ये छातीत व पोटात पाणी भरते महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. आतड्यांमध्ये पोटातल्या इतर अवयवांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे शरीर नित्राण होते. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे रक्तीपुरळ उठतात. कधीकधी शरीरात पाणी धरुन ठेवण्याचे प्रमाण जास्त झाल्यास मेंदूवर ताण येऊन फिट्स येऊ शकतात. शुद्ध हरपते, लिव्हर फेल्युअर होऊ शकते. क्वचित जी-बी सिंड्रोम नावाच्या विकारामुळे तीव्रता वाढू शकते.
उपचार : हा आजार कधीही घातक ठरु शकतो. त्यामुळे रुग्णाला इस्पितळात भरती करुन उपचार करणे योग्य ठरते. शरीरातील पाण्याची व क्षारांची पातळी योग्य राखावी लागते. कधी कधी संपूर्ण रक्त द्यावे लागते. आयबू बु्रफेन व अॅस्पीरीनचा उपयोग टाळावा लागतो कारण त्यामुळे रक्तस्त्रावाचा धोका वाढतो.
होमिओपॅथी : लक्षणांवरुन, शरीरावर उठणार्या पुरळावरुन अगणीत होमिओपॅथीक औषध अक्षरक्ष: जादू केल्यासारखी काम करतात.
युपॅटोरिया : हाडताप, घाम आल्याने बरे वाटते. प्रचंड अंगदुखी
रसटॉक्स : स्नायुदुखी, बेचैनी, फिरत हिंडत राहिल्याने आराम वाटतो.
जेल्सेमियम : पाठीमध्ये थंडकळ मारते. स्नायू खरवडल्यासारखे दुखतात, मंद डोके दुखी
प्रतिबंध
डासांची पैदास थांबवण्यासाठी डबक्यांमध्ये, तळ्याविहिरीमध्ये गप्पी मासे (पोसिला रेटीक्युलाय) सोडावेत व डासांची अंडी फस्त करुन पाणी स्वच्छ ठेवतात.
डासांपासून संरक्षण करण्यासाठी पावसाळ्या आधी किटकनाशक फवारणी करुन घ्यावी. मच्छरदाणीचा वापर करावा. परिसरात स्वच्छता राखावी.
ताप (ज्वर)
शरीराचे तापमान साधारण 98.6 डिग्री फॅरनहीट हे योग्य मानले जाते. यापेक्षा जर जास्त तापमान वाढले तर ज्वर आहे किंवा ताप आहे असे मानले जाते. ताप येणे हा मुख्य रोग नसून भिन्न रोगांचे लक्षण आहे.
ताप येण्याची कारणे
1) अति तिखट, उष्ण, आंबट पदार्थांचे सेवन करुन उन्हातून फिरणे
2) अतिथंड पदार्थांचे सेवन किेंवा पावसात भिजणे
3) रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन निरनिराळ्या साथीच्या रोगांमुळे ताप येणे
4) शिळे, कदान्न, अवेळी खाणे, थंड पदार्थ वारंवार खाणे, मद्यपान अतिरिक्त प्रमाणता करणे, जागरण, अतिश्रम, अनियमित व्यायाम यामुळे देखील वारंवार ताप येऊ शकतो.
5) भूक मंदावली असताना खूप खाणे किंवा गोड पदार्थांचा अतिरेक करणे
6) चुकीचे औषधोपचार वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे
7) अंमली पदार्थांचे सेवन करणे या घटक कारणांमुळे वारंवार ताप येऊ शकतो.
कारणे
1) सर्व प्रकारच्या संसर्गामध्ये ताप येतो. मग अगदी साध्या ‘फ्लू’ पासून ते मेनिजायटीस (मेंदूच्या आवरणाचा संसर्गदाह). टॉन्सीलायटीस, न्युमोनिया अशा अनेक विकारांमुळे ताप येतो. याला अनेक जीवाणू, विषाणू कारणीभूत असतात. विषमज्वर (टायफॉईड) हिंवताप (मलेरिया), गोवर, कांजिण्या अशा संसर्गामुळे ताप येणे हे प्रमुख लक्षण असते.
2) क्षयरोगामध्ये सर्वसाधारण सायंकाळी बारीक ताप येतो. खोकला असतो.
3) संधीवात, आमवात या विकारांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात थोडासा ताप सतत येत असतो. मूत्रविकारामध्ये ताप हे प्रमुख लक्षण आहे.
4) काही विशिष्ट ब्लड कॅन्सरमध्ये किंवा मोठ्या प्रमाणात कॅन्सर बळावल्यावर सारखा ताप येतो.
लक्षणे
अंगाचा दाह होणे, डोके जड वाटून तोंडाला चव नसणे, विलक्षण मळमळणे, भूक मंदावणे, थकवा येणे, अंग हातपाय दुखणे, डोके दुखणे, शरीराला सौम्य मुंग्या येणे, लघवी गरम व पिवळसर होणे, ग्लानी येऊन काहीबाही बरळणे, श्वास उष्ण होणे, जीभ अस्वच्छ, पिवळसर होणे, डोळ्यांची आग होऊन चेहरा फिकट वाटणे इत्यादी शिवाय झालेल्या रोगाची लक्षणेही तापाबरोबरच आढळून येतात.
रोगपरीक्षा
बहुतेकदा लक्षणावरुनच रोगपरीक्षा करता येते. हिवताप, विषमज्वर इतर साथीचे रोग फक्त लक्षणांवरुनही पडणाळून ताबडतोब उपचार चालू करता येतात. परंतु खात्री करण्यासाठी रक्त, लघवीची तपासणी उपयुक्त ठरते व विशिष्ठ आजारांसाठी विशिष्ठ उपवचार करता येतात.
उपचार
1) निसर्गोपचार : हलका आहार घ्यावा. स्नान करावयाचे असल्यास कोमट पाण्याने करावे. श्रम घेऊ नयेत. कोमट पाण्यातून लिंबूरस व खडीसाखर मिसळून प्यावे. सुंठ व काळी मिरीचा काढा करुन त्यात किंचीत मीठ घालून सेवन करावे. धणे व जिरे यांचे दोनास एक प्रमाणात चुर्ण घेऊन गुळात गोळ्या करुन सकाळ संध्याकाळ दोन दोन गोळ्या घ्याव्यात. ताप फारच असल्यास कपाळावर कोलनवॉटर किंवा मिठार्च्ंया पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. अंग थंड पाण्याने पुसून काढावे.
होमिओपॅथी : थंड वार्यातून फिरल्यावर येणार्या तापासाठी अकोनाईट तसेच बेलडोना हे मेडिसीन उपयुक्त आहे. टॉन्सील्समुळे किंवा तत्सम संसर्गामुळे खूप ताप आल्यास बेलाडोना व जेल्सेमियम ही औषधे चालतात. सगळ्या शरीरा ठणका असून खूप तहान लागणे, शौचास न होणे, जराशा हालचालीनेही त्रास होणे अशी लक्षण असल्यास ब्रायोनिया हे औषध देता येते. विषमज्वर (टायफॉईड) साठी बाप्टीशिया, अर्सेनिक, अर्निका, रसटॉकस्ट अशी विविध औषधे आहेत. लहान मुलांमध्ये अतिशय ताप येऊन डोक्याला चढतो व फीट्स येतात यावर उत्कष्ठ होमिओपॅथीक उपचार उपलब्ध आहेत.
संपर्क- सोनाली सरनोबत
सरनोबत क्लिनिक-
केदार-9964946818 क्लिनिओ-9916106896