जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्त्या प्रकरणी प्रमुख संशयित आरोपीनी खून प्रकरणात बेळगावातील सिम कार्डचा वापर केल्याने गेल्या महिन्यात घेऊन येऊन गेलेल्या एस आय टी पथकाने बेळगावात पुन्हा तपास सुरू केला आहे. मुख्य संशयित आरोपी परशराम वाघमारे यास पिस्तुल प्रशिक्षण बेळगावात दिले असल्याचा माहितीने मागील महिन्यात तर आता या प्रकरणी स्थानिक सीम वापरल्याने एस आय टी ची करडी नजर बेळगाव वर आहे.
हत्त्या प्रकरणात वापरलेलं एक सीम बस्तवाड(हलगा)येथील सूरज नावाच्या युवकाचे असल्याचे तपासात उघड झाल्याने एस आय टी च्या बेळगाव वाऱ्या वाढल्या आहेत.हे सिम सूरज कडूनत्याच्या मित्राद्वारे संशयित आरोपीला मिळाले होते त्यानंतर याचा वापर वापर खून प्रकरणात झाला होता .सूरज ने आपल्या गावातील एक मित्र ‘परशराम’ ला सीम कार्ड दिले होते दिले होते सदर सीम सूरज च्या आजोबाच्या नावे आहे सध्या परशराम बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेताहेत परशराम च्या नातेवाईकाच लग्न असल्याने तो बस्तवाड ला येईल म्हणून एस आय टी त्याच्या मागावर आहे.गेल्या 15 दिवसात एस आय टी दोनदा आली आहे अन या भागात तपास झाला आहे.
मागील महिन्यात मुख्य संशयित आरोपी परशराम वाघमारे यास बेळगाव खानापूर येथील जंगलात पिस्तुल चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली होती त्या अनुषंगाने देखील तपास झाला होता खानापूर जंगलात तपास झाला होता आता सिम कार्ड च्या निमित्ताने पुन्हा बेळगावातच तपास होतोय त्यामुळं गौरी लंकेश हत्या प्रकरणात बेळगाव देखील केंद्र म्हणून समोर येत आहे. सूत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार सिम कार्ड दिलेला परशराम कोणत्या संघटनेशी संबंधित आहे पिस्तुल प्रशिक्षणासाठी याचा संबंध आहे का?बेळगावातील आणखी कोण यात सामील आहे का याचा तपास देखील केला जाणार आहे.
बेळगाव हे कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवरच कन्नड मराठी इंग्लिश हिंदी भाषावर प्रभुत्व असलेल शहर असल्याने अनेक प्रकरणात बेळगावचे नाव आले आहे . बेकायदेशीर रित्या बांगला देशींचे वास्तव्य, ‘सिमीचे स्लीपर सेल’ यावेळीही शहर तपास यंत्रणांच्या रडार वर होते आता गौरी लंकेश मुळे पुन्हा एकदा राज्यातील गुप्तचर यंत्रणा बेळगावच्या मागोव्यावर आहे.