Tuesday, December 24, 2024

/

‘बालिका आदर्शने जपला आदर्श’

 belgaum

शाळा म्हणजे शिकवायचे काम, पण शाळाबाह्य उपक्रमातही शाळेने आघाडी घायला हवी. हा आदर्श बेळगावच्या बालिका आदर्श शाळेने जपला आहे.
सोमवारी शाळेतील २५०आणि मंगळवारी 200 मुलींनी फर्जंद हा चित्रपट बघितला. यात शाळेने मोठा पुढाकार घेतला होता.

Balika aadarsh

शिवरायांच्या इतिहासात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली त्या कोंडाजी फर्जंद यांच्या जीवनावर आधारलेल्या या चित्रपटातून इतिहास शिकण्याचा प्रयत्न या विद्यार्थिनींनी केला.
बालिका आदर्श शाळेने याकामी पुढाकार घेतला हे विशेष. ,उद्या आणखी २५० मुली हा चित्रपट पाहणार आहेत आणि खरा इतिहास समजून घेणार आहेत.
बेळगावात मराठी चित्रपट रिलीज झाले की त्यांची दयनीय अवस्था असते प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे वळत अश्यात मराठी चित्रपट शाळात दाखवणे म्हणजे एक प्रकारे मराठी संस्कृती टिकवण्याचे काम होत आहे.फरझंद चित्रपटाला ऐतिहासिक वारसा आहे त्यातच बेळगाव हे शिव प्रेमींची खाण मानली जाते असे असताना चित्रपट गृह खाली पडला होता अश्यात बालिका आदर्श शाळेच्या विद्यार्थीनी श्रेया सव्वाशेरी हिने खास व्हीडिओ बनवून सोशल मीडियावर चित्रपट बघण्याचे आवाहन केले होते.
चित्रपट कुठले पाहावेत आणि पाहू नयेत हे पालकांना ठरवण्यात येत नसण्याचा युगात आज एक शाळा आपल्या मुलींना एक चित्रपट दाखवते तोही इतिहासावर आधारित, धन्य ते संस्था चालक आणि शिक्षक…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.