सरकारी नोकरी केवळ इंग्लिश माध्यमातून शिकलेल्या मुलांना मिळते असा गैर समज शिवाजीनगर येथील सत्तावीस नंबर सरकारी प्रायमरी मराठी शाळेत शिकलेल्या सत्तावीस नंबर शाळेचा विद्यार्थ्याने दूर करत चक्क इंडियन एअर फोर्स मध्ये नोकरी मिळवली आहे.शिवाजी नगर पहिली गल्ली दुसऱ्या क्रॉस मध्ये राहणारा अनिकेत राजकुमार खटावकर हा भारतीय वायू सेनेत ‘ऑटो टेक्नीकल’ या पदावर रुजू झाला आहे.
वयाने १९ वर्ष असलेल्या अनिकेतचे प्राथमिक शिक्षण शिवाजीनगर बेळगाव येथील सत्तावीस नंबर शाळेत झाले होते प्राथमिक शाळेत तो सुरुवाती पासून हुशार विद्यार्थी होता सेन्ट्रल हाय स्कूल मध्ये हायस्कूल तर मराठा मंडळ मधून बारावी सायन्स उत्तीर्ण होऊन त्याने जैन कॉलेज मध्ये डिप्लोमा इलेक्ट्रोनिक आणि कम्युनिकेशन मध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होता. गेल्यावर्षी जानेवारी २०१८ मध्येबंगळूरू येथे झालेल्या एअर फोर्स रिक्रुटमेंट परीक्षा दिली होती संपूर्ण देशातील ३६०० मुलांत अनिकेत याची निवड झाली होती.गेली सहा महिने सांबरा येथील वायू सेनेच्या प्रशिक्षण केंद्रात त्याने प्रशिक्षण पूर्ण करून गेल्या १५ जून रोजी शपथ घेतली होती. सध्या त्याने चेन्नई येथे आपल्या सेवेचा कार्यारंभ केला आहे.
इंग्लिश मिडीयम मध्ये शिकल्यास यश मिळतंय अस काही नाही मुळात अभ्यास मेहनती वर बरच यश अवलंबून असतंय अनिकेतने मराठी माध्यमातून शिकूनच इंडियन एअर फोर्स मध्ये मजल मारली आहे. मुळात उत्तर भारतीय हिंदी भाषिक, केरळीयन,तमिळ आंध्रचे विध्यार्थी वायू सेनेत संख्येने अधिक प्रमाणात भर्ती होत असतात त्या तुलनेत कर्नाटक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या खूप नगण्य असते त्यातच माझ्या मुलाने हे यश मिळवलय याचा सार्थ अभिमान आहे अशी प्रतिक्रिया अनिकेतचे वडील राजकुमार खटावकर यांनी बेळगाव live शी बोलतना दिली आहे.
बेळगाव शहरासह तालुक्यात एकीकडे मराठी प्राथमिक शाळांची इयत्ता पहिलीतील पटसंख्या वाढवण्यासाठी युवा समितीच्या माध्यमातून प्रयत्न होत असताना दुसरीकडे मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन मराठीतील नभाची झेप घेणारा अनिकेत हा प्रायमरी मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा आदर्श बनो हीच सदिच्छा…