बेळगाव रेल्वे स्टेशनवर कुणीही इतर खात्यातील अधिकारी असो,राजकीय व्यक्ती असोत किंवा सामाजिक कार्यकर्ते गेलेले असोत त्यांच्याशी सर्वांशी जनसंपर्क ठेऊन इतर घटकांना रेल्वे स्टेशनशी जोडलेले व्यक्तिमत्व म्हणजे स्टेशन मास्तर एस सुरेश…
सुरेश हे नाव बाहेरच्या कुणाला जास्त ठाऊक नसलं तरी मात्र रेल्वे स्थानकाशी संबधित प्रत्येक व्यक्तीच्या मनात बसलं आहे त्याचं मुख्य कारण त्यांच्या रेल्वे स्टेशनशी जोडलेल्या माणसाचा जनसंपर्कामुळे..
आपल्या आयुष्यातील तब्बल २४ वर्षे बेळगाव जिल्ह्यात विविध रेल्वे स्थानकावर सेवा बजावून स्टेशन मास्तर एस सुरेश सेवा निवृत्त झाले आहेत.एकूण ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेपैकी त्यांनी २४ वर्षे बेळगाव परिसरात काढली होती त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क या भागात होता.रेल्वे स्थानकाचा विकास असोत किंवा इतर मुलभूत सुविधा मिळवण्यासाठी खासदार सुरेश अंगडी आणि इतर अधिकाऱ्यांशी अगदी चागले संबंध ठेवले होते रेल्वे स्टेशन विकासात त्यांचा खारीचा वाटा आहेच त्यांच्या सेवा निवृत्ती मुळे अश्या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची उणीव रेल्वे स्थानकाला नक्कीच भासणार आहे.
एस सुरेश यांच्या सेवा निवृतीच्या निमित्ताने रेल्वे कम्युनीटी भवनात त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार सुरेश अंगडी,आमदार अनिल बेनके,रेल्वे प्रशिक्षक सुनील आप्टेकर,पी सेल्वन ,हुबळी रेल्वे अधिकारी कृष्णा रेड्डी,शासकीय अधिकारी विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. बेळगाव मधली सेवा आयुष्यात अविस्मरणीय राहील माझें मूळ गाव शिमोगा असले तरी ते बेळगावातच स्थायिक आहेत या शहराने मला खूप दिलंय अशी भावना सुरेश यी यावेळी व्यक्त केली.