Friday, October 18, 2024

/

स्वच्छ भारत सर्वेक्षण रँकिंग मध्ये बेळगावची पिछेहाट

 belgaum

बेळगाव शहराची निवड स्मार्ट सिटी योजनेत झाली असली तरी स्वछतेच्या बाबतीत बेळगाव शहर खूपच मागे पडले आहे.एकीकडे पालिकेचे अधिकाऱ्यांनी या अगोदर पाणी पुरवठा योजनेत सह अन्य प्रकारात केंद्र सरकारचे पुरस्कार प्राप्त केले असले तरी दुसरीकडे स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये मागील वर्षी पेक्षा घसरण झाली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत बेळगाव शहराला 270वे (एकूण 485 पैकी) राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळाले आहे तर कर्नाटक राज्यात देखील 14 वे नामांकन प्राप्त झाले आहे.राष्ट्रीय स्तरावर मागील वर्षी 2017 मध्ये बेळगावचा क्रमांक 248 व्या स्थानावर होता यावर्षी 270 व्या आल्याने 22 फरकांनी नामांकनात घसरण झाली आहे.

DRainage water on road(फोटो- बेळगाव सिव्हील हॉस्पिटल समोर ड्रीनेजचे पाणी मुख्य रस्त्यावर आलेलं आहे)
स्वच्छ भारत योजने अंतर्गत सर्व्हेचे आयोजन करण्यात आले होते एक लाखां पेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या(अमृत योजनेत) असलेल्या 485 शहरात सर्वे करण्यात आला होता.चार वर्षां पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता भारत योजना अमलात आणली होती.2018 च्या स्वच्छ भारत सर्वेक्षण शहरी भागातील स्वछतेला प्राधान्य देण्याच्या हेतूने जारी करण्यात आले होते.4 जानेवारी ते मार्च 10 च्या दरम्यान देशातील 4203 शहरात सर्व्हे केलेला होता यात 43 अमृत योजनेतील शहर आणि एक लाखा पेक्षा कमी असलेली 217 शहरांचा समावेश होता.

स्वछतेच्या बाबतीत बेळगाव शहर हळूहळू मागे  पडत आहेत सांडपाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर येताना दिसत आहे या अस्वच्छतेस सुस्त पालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.